Grampanchyat 
पुणे

भाऊ, पुढच्या वेळी तुला नक्की चान्स देतो...

धोंडिबा कुंभार

पिरंगुट - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज इच्छुक उमेदवारांकडून अन्य उमेदवारांनी माघार घेण्यासाठी मनधरणी करण्यासाठी मोठीच धावाधाव चालू होती. ‘पुढच्या वेळी तुला चान्स देतो’, ‘तुला शब्द दिला म्हणजे दिला’ या आणि अशा आश्वासनांची खैरात करीत अनेक उमेदवारांनी स्पर्धक उमेदवारांची विनवणी अगदी दुपारी तीनपर्यंत चालूच होती. त्यामुळे कासार आंबोली येथील केंद्रावर आजही शेवटच्या दिवशी वाहनांच्या रांगा आणि माणसांची गर्दी झाली होती. 

पिरंगुट गणातील सहापैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर होत्या. यापूर्वी या गणातील भोईणी, मुठा व आंबेगाव या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. आज बोतरवाडी व कोळावडे ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर होत्या. यापूर्वी तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपेकी लवळे ही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे- कोलाड रस्त्यावर सुतारवाडी ते घोटावडे फाटा आदी परिसरातील हॅाटेल गजबजून गेली होती. दुपारी तीन वाजता माघारीची अंतिम वेळ असल्याने अनेकांची पळापळ सुरू होती. तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी कासार आंबोली केंद्रावर ठाण मांडले होते. येथील सभागृहात तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींसाठी माघारीचे अर्ज स्वीकारले जात होते. ज्या उमेदवारांकडून अर्ज भरल्याची पोचपावती दाखविली जात होती, त्यांनाच पोलिस आत प्रवेश देत होते. त्यामुळे दडपशाही, धाक अथवा अन्य प्रलोभने देऊन बळजबरीने अर्ज माघारी घेण्याच्या घटनांना पूर्ण आळा बसलेला दिसून येत होता.

मध्यस्थांना फोनाफोनी
काही उमेदवारांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यापासून ‘टांगा पलटी, घोडे फरार’ धोरण स्वीकारल्याने त्यांच्या शोधासाठी काहींना जंगजंग पछाडावे लागत होते. मित्रमंडळींना, मध्यस्थींना फोनाफोनी आणि निरोपावर निरोप देण्याची लगीनघाई सर्वत्र दिसून येत होती.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT