पुणे

मुक्त विद्यापीठातर्फे ‘पोर्ट मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम

CD

पुणे, ता. २० : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे या शैक्षणिक वर्षापासून ‘बीबीए इन पोर्ट मॅनेजमेंट’ हा नावीन्यपूर्ण पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता देखील मिळाली आहे.

आगामी काळातील जगातील सर्वात मोठ्या दहापैकी एक गणल्या जाणाऱ्या वाढवण बंदराच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर सागरी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात कुशल मनुष्यबळासाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘बीबीए इन पोर्ट मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. हा इंग्रजी भाषेतून आणि तीन वर्षांच्या मुदतीचा (सहा सत्रे) पदवी अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

विशेष म्हणजे या अभ्यासक्रमासोबत विद्यापीठातर्फे प्रत्येकी सहा महिने कालावधीचे ‘कस्टम्स क्लिअरन्स अँड फ्रेट डॉक्युमेंटेशन सुपरवायझर’ आणि ‘वेअरहाऊसिंग अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’ हे दोन रोजगाराभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स, कस्टम्स, फ्रेट फॉरवर्डिंग, वेअरहाउसिंग आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील वाढत्या मनुष्यबळाच्या गरजा लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम तयार केले आहेत. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

‘पोर्ट मॅनेजमेंट’ या अभिनव अभ्यासक्रमामुळे महाराष्ट्रातील तसेच देशातील वाढत्या सागरी आणि लॉजिस्टिक्स अर्थव्यवस्थेसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यास योगदान मिळणार आहे. त्यामुळे सागरी बंदर, लॉजिस्टिक्स आणि संबंधित क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल.
- डॉ. संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Mumbai News: कांजूरमार्गात धावत्या लोकलच्या छतावर चढला तरुण; OHE वीजपुरवठा बंद, रेल्वे सेवा विस्कळीत

Pune Civic Warning: पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य; आठ दिवसांत खड्डे बुजवा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा स्थायी समिती अध्यक्षांचा इशारा

Kondhwa Anti-Drug Action: कोंढव्यात अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; गांजा खरेदीसाठी आलेले ६१ जण ताब्यात, दोन सराईत विक्रेते अटकेत

Pune Noise Control: डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा साऊंड तपासणी उपक्रम; कर्णकर्कश ध्वनी रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

SCROLL FOR NEXT