कात्रज - बेकायदा बांधकामांनी व्यापलेल्या टेकड्यांवरील बीडीपी, डोंगर उतार व माथा परिसरात शिल्लक राहिलेल्या मोजक्‍या जागांची विक्री करण्यासाठी होत असलेले प्लॉटिंग. 
पुणे

#BDPIssue कात्रजमध्ये बीडीपीवर हागणदारी

सचिन कोळी

कात्रज - स्वच्छतागृहाविना असलेल्या बेकायदा बांधकामांच्या विळख्यात सापडलेले जैववैविध्य विकास उद्यान (बीडीपी) क्षेत्र पुरेपूर हागणदारीयुक्त झाले आहे. हागणदारीमुळे वाढलेली डुकरांची संख्या, भटक्‍या कुत्र्यांचा वावर, सांडपाणी आदी समस्यांनी कात्रज परिसरातील बीडीपी क्षेत्र साथीच्या रोगांचे उत्पत्ती स्थान ठरत आहे.  

कात्रज परिसरातील सुमारे दीडशे हेक्‍टर बीडीपी, डोंगरमाथा व उतार क्षेत्रात प्लॉटिंगचा धमाका आणि सातत्याने होणारी बेकायदा बांधकामे रोखण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. शहराला ऑक्‍सिजन मिळावा, या दूरदृष्टीने शहराभोवतालच्या टेकड्यांवर जैववैविध्य उद्यानांसाठी आरक्षणे टाकण्यात आली. मात्र वीसवर्षांत जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात घेणे, त्यावर वृक्ष लागवड करण्यात झालेल्या दिरंगाईचा फटका पर्यावरणपूरक उद्देशाला बसला आहे. जागा खरेदी व विक्रीला कायदेशीर बंधने न  घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यववहार झाले. हवालदील झालेल्या जागा मालकांनी जागा विकण्याचा सपाटा लावला. वीज आणि पाणी तत्काळ मिळाल्यामुळे स्वस्तात मिळणाऱ्या जागा घेऊन सर्वसामान्यांनी घरे बांधली.

महापालिका तिप्पट मिळकत करसंकलन करू लागली. बेकायदा बांधकामांचा महसूल गोळा करताना महापालिकेने मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याकडे केलेले दुर्लक्ष नागरी आरोग्यासाठी धोकादायक ठरू  लागले आहे. आगम टेकडी परिसरातील बीडीपी क्षेत्रात डुकरांची वाढती संख्या मोठी डोकेदुखी ठरत आहे.  साई मंदिर परिसरात दोन आठवड्यांपूर्वी सुजाता शिवतारे या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला ही घटना परिसरात यामुळे स्वाइन फ्लू पसरत असल्याचे साक्ष देत आहे. मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोका वाढतोय. बालकासह, शालेय विद्यार्थी, महिला व वृद्धांना एकाच दिवशी कुत्र्याने चावा घेण्याची घटना ताजी आहे.

या भागात केवळ पंचवीस टक्के बीडीपी क्षेत्र शिल्लक राहिले आहे. उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांवर जागामालक दगडांचा मारा करतात. मिळकत कर गोळा करणाऱ्या महापालिकेने ‘ऑक्सिजन पार्क’ऐवजी हागणदारीयुक्त, रोगराईचे आगार असलेली बीडीपी शहराच्या माथी मारली आहे.  
- संदीप लोंढे, अध्यक्ष, मानवाधिकार संघ, महाराष्ट्र राज्य 

बीडीपी क्षेत्रातील जागेचे व्यवहार करू नका, असे फलक उभारणार, जागांचे व्यवहार होऊ नयेत म्हणून उपनिबंधकांना माहिती देणार, वीज व पाणी देण्यास प्रतिबंध करणार, बेकायदा प्लॉटिंग व बांधकामांवर सातत्याने कारवाई करणार या महापालिकेच्या घोषणा केवळ वल्गना ठरल्या आहेत.
- योगेश पोरेडी, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT