sakal
पुणे

Crime News : बाहेर जाताना घराची चावी बुटात ठेवताय तर सावधान! आव्हाळवाडीत चार तोळे सोने व रोकड लंपास

घर बंद करून व चावी बुटात किंवा अन्य ठिकाणी ठेवून बाहेर जाताय तर सावधान. तुम्ही ही चोरांचे शिकार होवू शकता.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली - घर बंद करून व चावी बुटात किंवा अन्य ठिकाणी ठेवून बाहेर जाताय तर सावधान. तुम्ही ही चोरांचे शिकार होवू शकता. असाच प्रकार शनिवारी दुपारी आव्हाळवाडी येथील प्रणिती कॉम्प्लेक्स मध्ये घडला. चोराने बुटातील चावी घेवून सदनिका उघडुन चार तोळे सोन्याचे दागिने व ४५ हजार रुपये रोकड लंपास केली.

मिळालेल्या माहितीनुसार, या कॉम्प्लेक्स मधील चौथ्या मजल्यावर दोन तरुण एका सदनिकेत राहतात. दोघे जण कंपनीत कामाला असल्याने बाहेर जाताना ते बुटात चावी ठेवून जात होते. याचाच फायदा घेवुन चोरट्याने शनिवारी १२ वाजण्याच्या सुमारास बुटातील चावी घेतली. दरवाजा उघडला व सोन्याचे दागिने व रोकड वर डल्ला मारला. सुमारे साडे तीन लाख रुपयांचा हा ऐवज होतो.

सी सी टीव्ही फुटेज मध्ये एक अनोळखी तरुण त्या वेळी सोसायटीत आल्याचे दिसत आहे. त्याने तोंडाला रुमाल ही बांधला होता. नंतर तो काढल्याचेही दिसते. याबाबत सूरज कांबळे यांनी पोलीसात तक्रार केली आहे. पोलीसानीही घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

26 जानेवारीला अशाच घटनेत दागिने व रोकड लंपास

वाघोलीतील ब्लीथ आयकॉन सोसायटीत अशाच प्रकारे चोरी झाली होती. बुटात ठेवलेली चावी चोराने घेवून सदनिकेतील ३६ तोळे चांदीचे दागिने व १५ हजारांची रोख रक्कम लंपास केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

T20 WC: फखरची साथ अन् फरहानने मोडला विराटचा १२ वर्षे जूना विश्वविक्रम! पाकिस्तानच्या सलामीवीरांनी श्रीलंकेला घरच्या मैदानातच रडवलं

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : बर्ड फ्लूच्या खबरदारीमुळे संजय गांधी बायोलॉजिकल पार्क तात्पुरते बंद करण्यात आले

SCROLL FOR NEXT