पुणे

Loksabha 2019 : स्लिपांचे वाटप करणाऱ्या डॉक्‍टरला मारहाण

सकाळवृत्तसेवा

हिंजवडी - भाजपतर्फे मतदार स्लिपांचे वाटप करणाऱ्या एका डॉक्‍टरला मारहाण केल्याप्रकरणी हिंजवडीचे माजी सरपंच सागर दत्तात्रय साखरे याला अटक करण्यात आली. मंगळवारी (ता. २३) त्याला न्यायालयासमोर हजर केले असता मतदानासाठी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणी डॉ. आकाश राठोड (वय २६, रा. गोखलेनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, मंगळवारी मतदानासाठी हिंजवडीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

साखरे याला पुढील पंधरा दिवस दररोज पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डॉ. राठोड हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत हिंजवडी गावठाण परिसरात मतदारांना स्लिपा वाटत होते. त्या वेळी सागर साखरे व त्याच्या अन्य साथीदारांनी त्यांना बोलावून शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्या वेळी राठोड यांचे अन्य सहकारी पळून गेले. जखमी झालेल्या राठोड यांनी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार सोमवारी (ता. २२) रात्रीच साखरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुक्‍याच्या माजी सभापती कोमल साखरे (बुचडे) यांचा सागर हा पती आहे. त्याच्यावर यापूर्वी खंडणीसह हाणामारीचे काही गुन्हे दाखल आहेत, असे गवारी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दरम्यान, मंगळवारी मतदानाच्या दिवशी हिंजवडीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सीआरपीएफच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले होते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT