Beating Sakal
पुणे

तोकडी कपडे परिधान करीत असल्याने आयटी कंपनीतील तरुणींना मारहाण

भाड्याच्या सदनिकेमध्ये राहणाऱ्या आयटी कंपनीतील तरुणी केवळ तोकडी कपडे परिधान करीत असल्याने सोसायटीतील लोकांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

भाड्याच्या सदनिकेमध्ये राहणाऱ्या आयटी कंपनीतील तरुणी केवळ तोकडी कपडे परिधान करीत असल्याने सोसायटीतील लोकांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पुणे - भाड्याच्या सदनिकेमध्ये राहणाऱ्या आयटी कंपनीतील (IT Company) तरुणी (Girls) केवळ तोकडी कपडे परिधान (Cloth Wearing) करीत असल्याने सोसायटीतील लोकांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबरोबरच घरमालकीणीलाही शिवीगाळ करण्यात आली आहे. विशेषतः मारहाण झालेल्या तरुणी परप्रांतीय आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तीन महिलांसह सहा जणांना अटक (Arrested) केली आहे.

अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण सचिन पठारे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी ज्योती संजय येळे (रा. लेक्‍सीस सोसायटी, खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी येळे यांची खराडीतील रक्षकनगर परिसरातील लेक्‍सीस सोसायटीमध्ये सदनिका आहे. त्यांनी त्यांची सदनिका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणींना भाडेतत्वावर राहण्यासाठी दिली आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीही त्याच सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. संबंधित तरुणी तोकडी कपडे परिधान करुन ये-जा करतात. त्याचा रहिवाशांना त्रास होतो, असा आरोप करीत संबंधित महिला व पुरुष बुधवारी रात्रीच्या सुमारास फिर्यादीच्या सदनिकेमध्ये शिरले. त्यांनी फिर्यादीच्या सदनिकेमध्ये राहणाऱ्या तरुणींना शिवीगाळ करीत चप्पलने मारहाण केली. तसेच फिर्यादी येळे यांनाही त्यांनी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर सोनवणे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT