A beautiful song is Created at home by Aditya mahajan and Dhanashri Ganatra during lockdown: 
पुणे

Video :लॉकडाउनमधली 'त्याची' चारोळी आणि 'तिचं' गाणं; एकदा पाहाच रिफ्रेश व्हाल!

शरयू काकडे

पुणे: लॉकडाऊन लागु झाल्यापासून आपण सर्वच जण घरात लॉक आहोत. आता तर या लॉकडाऊनचा सर्वांनाच कंटाळा आला आहे. या बोअरिंग लॉकडॉऊनला एंटरटेंनिग बनविण्याचा प्र प्रयत्न करीत आहे. असेच लॉकडाऊन बोअर झालेल्या पुण्याच्या कवी आदित्य महाजन अन् गायिका-संगीतकार धनश्री देशपांडे यांनी एक सुंदर गाणे तयार केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप



तुम्ही म्हणाल की, यात विशेष काय बुवा? विशेष म्हणजे हे गाणे पुण्यातील कोणत्याही स्टुडिओमध्ये न करता घरबसल्या तयार केले आहे. गाण्याचे लेखन, संगीत, गायन इतकेच नव्हे तर या गाण्याचा सुंदर व्हिडिओ देखील घरबसल्या एडिट केला आहे. तुम्हीही बघा हा व्हिडिओ.... तुम्हीही रिफ्रेश व्हाल!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 त्याचे झाले असेकी, आदित्यने लिहिलेली एक चारोळी काही दिवसांपुर्वी धनश्रींच्या वाचण्यात आली अन् त्यांना तिथेच त्याची चाल सुचली. मग काय त्यांनी आदित्यला 'त्या' चारोळीची कविता लिहीण्यास सांगितले. अन् बघता बघता चारोळीची कविता झाले, कवितेचे गाणे झाले. त्यानंतर गाण्याच्या संगीताचे, गायनाचे रेकॉर्डिंगही धनश्री यांनी घरीच केले. गाण्याचे मास्टरींग आणि मिक्सिंग अजय अत्रे ह्यांनी सुद्धा घरात बसूनच करून दिले. या सुंदर गाण्याला साजेसा एक व्हिडिओ आदित्याने घरीच तयार केला. अन् या बोअरिंग लॉकडाऊनमध्ये सुंदर कलाकृती पैंजण, द म्युझिकल.. तयार झाले.

विद्यार्थ्यांनो, 15 जुनला शाळेचा पहिला दिवस पण...

शेवटी घरबसल्या सोशल मिडियावर हे गाण लॉंच केले आणि लाखो लोकांपर्यंत पोहचले. अवघ्या काही काळात हे गाणे सोशल मिडियावर व्हायरल झाले. घरबसल्या तयार केलेल्या या कलाकृतीची दखल कला क्षेत्रातील लोकांनीही घेतली.

विद्यार्थ्यांनो, 15 जुनला शाळेचा पहिला दिवस पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT