Gopal Italia
Gopal Italia sakal
पुणे

AAP: 'कोल्हापुरचे पार्सल पुढच्या निवडणुकीत पाठवून देऊ' आपची पंढरपूर रायगड स्वराज्य यात्रा पुण्यात, नेत्यांची घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जनतेचा मनातील विचार ओळखणारा राजकीय पक्ष म्हणून आम आदमी पक्षाचा (आप)हा पर्याय निर्माण झाला आहे. या पक्षाने सामान्य नागरिकांना राजकारणामध्ये येऊन देशाचे उज्ज्वल घडविण्यासाठीचा विश्वास निर्माण करून दिला आहे.

स्वराज्य यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून असेच कष्ट केल्यास राज्यात आणि पुणे महापालिकेवर आपली सत्ता नक्की येईल, असा विश्वास आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सहसचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी व्यक्त केला. आम आदमी पक्षाच्या पंढरपूर ते रायगड या स्वराज्य यात्रेचे पुण्यात स्वागत करण्यात आले. त्यावेळी गोपाळ इटालिया बोलत होते.

विजय कुंभार, मुकुंद किर्दत, धनंजय शिंदे, संदीप सोनवणे, संदीप देसाई, सुनीता काळे आदी उपस्थित होते. गोपाळ इटालिया म्हणाले, फक्त भाषण करून नेता बनता येत नाही तर शाळा, रुग्णालय बांधून नेता होता येत हे केजरीवाल यांनी दाखवून दिले.

स्वराज यात्रा सुरू झाली तेव्हा धोडीशी धाकधूक होती, पण कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन करून शानदार पद्धती होत आहे यात्रा ही आपली ताकद आहे. असेच काम करत राहिलो तर पुणे महापालिका, राज्यात सत्ता येईल.

गुजरातमध्ये सगळे पैसेवाले, गुंड भाजपमध्ये आहेत. तर घराणेशाही असणारे काँग्रेसमध्ये आहेत. पण सामान्य लोकांना पक्ष हा आपच आहे. ज्यांना स्वतःसाठी काही नको, पण भारत प्रगतशील झाला पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजेत असे ज्यांना वाटते ते सर्वजण आपमध्ये पक्षांमध्ये आहेत. स्वत:चा पैसा, वेळ देऊन पक्षासाठी काम करत आहेत.

भाजपमध्ये कार्यकर्त्यांना ठेके मिळतात, पण आप मध्ये असे काही मिळत नाही असा टोला इटालिया यांनी लगावला.विजय कुंभार म्हणाले, "कोल्हापुरचे पार्सल पुढच्या निवडणुकीत पाठवून देऊ. अरविंद केजरीवाल यांना हे लावलेले रोेेेपटे मोठे होत असताना आपणही बदलले पाहिजे. आप कोणेलाही काही देत नाही पण समाजाला सबल बनविण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT