पुणे

वाल्मीक कराडला बीडमधून हलवा

CD

​बीड, ता. १९ : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी सुविधा पुरविल्या जात असल्याचा आरोप होत असून, त्याला नागपूर किंवा चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात हलवावे, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृह महानिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्हा कारागृहातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्याने कराडला विशेष सवलती दिल्या जात आहेत. कारागृह अधीक्षकांच्या दालनाशेजारील खोलीचा वापर करणे, सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या हॉस्पिटलच्या खोलीत वारंवार राहणे आणि कुटुंबीयांना नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉलच्या लिंक पाठवणे, असे गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ​नियमानुसार कैद्यांना आठवड्यातून केवळ दोनदा व्हिडिओ कॉलची परवानगी असताना, कराडच्या पत्नी व मुलाच्या व्हॉट्सॲपवर वारंवार लिंक कशा पाठवल्या जातात, असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला.
​दरम्यान, बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक राजाराम चांदणे यांनी धनंजय देशमुख यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यापूर्वीही अशा तक्रारी झाल्या असून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. कोणतेही तथ्य आढळले नाही, असे स्पष्टीकरण चांदणे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Superstition Law: बुवाबाजीला आळा घालणार कसा? जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १३ वर्षे, नियम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष

IND vs SL 2nd Test: मोठा धक्का! दुसऱ्या कसोटीतून तीन प्रमुख खेळाडूंची माघार; आता WTC Final मध्ये पोहोचणार कसे?

Maharashtra Education: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक स्थिती! नववी-दहावीत ९ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य; एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर पुन्हा भाजपला डिवचले

Kupwad MIDC Two dead Shock : सांगलीत क्रेनचा विद्युतवाहिनीला धक्का; दोघांचा जागीच मृत्यू, कुपवाड एमआयडीसीतील घटना

SCROLL FOR NEXT