बीड जिल्ह्यात डिसेंबरमध्ये
विवाह सोहळ्याचे आयोजन
नवदांपत्यांना मिळणार २५ हजाराचे अनुदान
बीड : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १४, १५, ३० आणि ३१ डिसेंबर २०२६ रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे जिल्हा प्रशासनाकडून आयोजन करण्यात आले आहे.
लग्नातील अनावश्यक खर्च टाळून सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून नवदांपत्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या
सोहळ्यात आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर आणि लग्नाचा खर्च पेलू न शकणाऱ्या गरजू कुटुंबांना प्रामुख्याने यात सामावून घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एफ.एम.शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कालिदास बडे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक केदार गरड यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. जॉन्सन म्हणाले,‘‘राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महिला व बालविकास विभागामार्फत हे अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ खऱ्या गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यावर भेटी देवून पुढील डिसेंबर महिन्यात विवाह करू इच्छिणाऱ्यांची माहिती संकलित करावी. या उपक्रमाची गावागावात जनजागृती करण्याची जबाबदारी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. गावातील इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज जमा करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात येत्या १४, १५, ३० आणि ३१ डिसेंबर २०२६ रोजी हे सामूहिक विवाह सोहळे पार पडणार आहेत.
.... फोटो B17844 ...
बीड : सामुहिक विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी आढावा बैठकित सहभागी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.