lok sabha result esakal
पुणे

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

lok sabha result: पुण्यातील मतदान संपल्यानंतर भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे खासदार म्हणून पोस्टर लावले होते.

सागर आव्हाड

lok sabha result

पुण्यात लोकसभा निडणुकांचा निकाल लागण्याआधीच महाविकास आघाडी व भाजपकडून आपल्या उमेदवारांचे खासदार झाल्याचे पोस्टर झळकले आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल ४ जूनला लागणार आहेत. मात्र त्यापूर्वी उतावीळ कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना विजयी घोषित केलं.

पुण्यातील सारसबाग परिसरामध्ये आबा बागुल मित्र परिवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवारांची विजयी पोस्टर लावले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी देखील मुरलीधर मोहोळ यांचे बॅनर लावले आहेत.

पुण्यातील मतदान संपल्यानंतर भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे खासदार म्हणून पोस्टर लावले होते. त्यानंतर अमित बागुल यांनी सारसबाग परिसरामध्ये सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे यांना दणदणीत विजय केल्याबद्दल पोस्टर लावले आहेत. मात्र बॅनरवर मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा फोटो नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाणं आलं आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)  महाविकास आघाडीचे  उमेदवार संजोग वाघेरे  यांच्यात लढत झाली आहे.

निकाल लागण्याआधीच भाजप आणि महाविकास आघाडीला पोस्टर लावण्याची घाई झाल्याचं यावरून दिसते. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार मतदारांनी निर्धार करून मारला शिका, खासदार आमचा झाला पक्का, गुलाल आमचाच असा पोस्टरवर उल्लेख असणारे बॅनर सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेतोय.
 
पुण्यात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. त्याचा फायदा कुणाला होणार कडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पुण्यातील भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांना आधीच विजय घोषित केल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT