आयुक्तांच्या आदेशाला तीन महिने; तरीही अतिक्रमण कायम!
बेगम पेठ पोलिस चौकीमागील अतिक्रमण शेड काढण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१ ः बेगम पेठ पोलिस चौकीच्या मागे महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या जागेत पूर्वपरवानगी न घेता, पत्रा शेड उभारून सुमारे ५०० चौरस फूट जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे बांधकाम दोन दिवसांत स्वतःहून काढून जागा मोकळी करावी, अन्यथा भाडेपट्टा करार रद्द करून अतिक्रमण विभागामार्फत शेड पाडून जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येईल, असा आदेश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी तीन महिन्यांपूर्वी दिला. मात्र, अद्याप हे अतिक्रमण काढण्यात आलेले नाही.
बेगम पेठ पोलिस चौकीमागील जागा स्थायी समितीच्या ठरावानुसार २९ वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. या जागेवर सुमारे ५०० चौरस फुटांचे अतिक्रमण करून राजकीय कार्यालय थाटण्यात आल्याची तक्रार रियाज खरादी यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी जनता दरबारात केली होती.
त्यानंतर महापालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मुस्ताक शेख यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावरील खुलासा असमाधानकारक, चुकीचा अन् दिशाभूल करणारा असल्याचे नमूद करत महापालिकेने अंतिम नोटीस बजावली. १७ जून २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र, संबंधित व्यक्ती सुनावणीस उपस्थित राहिली नाही. त्यामुळे १९ जूनला लेखी स्पष्टीकरण अन् संबंधित पुराव्यांसह अंतिम संधी देण्यात आली.
सुनावणीच्या आदेशात भाडेतत्त्वावरील जागेत पूर्वपरवानगीशिवाय बांधण्यात आलेला शेड दोन दिवसांत काढून घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मुदतीत शेड न काढल्यास भाडेपट्टा करार रद्द करून महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शेड निष्कासित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, आदेशाला तीन महिने उलटूनही अतिक्रमण विभागाकडून शेड हटविण्यात आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.