बेल्हे, ता. १६ : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एकमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिलीच्या पूर्वतयारी वर्गाचा प्रारंभ डॉ. मनोहर खोमणे यांच्या हस्ते करण्यात आला. आदर्श शाळा योजनेतून या वर्गासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ, उपाध्यक्ष वैशाली मटाले, प्रशांत औटी, ईश्वर पिंगट, गोरक्ष शिरतर यांच्यासह पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी शाळेतील आयडियल टीचर लॅब, एआय लॅब, मंथन ऑलिम्पियाड तयारी, डिजिटल अध्यापन अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण देण्यासोबतच, आगामी वर्षापासून ''स्पोकन इंग्लिश''चे स्वतंत्र वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले. हरिदास घोडे, अशोक बांगर व संतोष डुकरे यांनी पालकांशी संवाद साधला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिरा बेलकर, रोहिदास साळवे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू असून पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.