Bendarwadi Road sakal
पुणे

Bendarwadi Rain : बेंढारवाडीकडे जाणारा रस्ता मुरूम, माती रस्त्यावर आल्याने झाला बंद

मुसळधार पावसाने बुधवारी रात्री बेंढारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेंढारवाडी घाटात डोंगरावरील मुरूम, मातीचा भाग रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीस झाला बंद.

सकाळ वृत्तसेवा

फुलवडे - पोखरी (ता. आंबेगाव) येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी रात्री बेंढारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेंढारवाडी घाटात डोंगरावरील मुरूम, मातीचा भाग रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला. संबंधित विभागाने तातडीने रस्त्यावरील दगड माती हटवून रस्ता खुला करावा, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक कोळप व नामदेव दांगट यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात बुधवार (ता. २४) दुपार पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पोखरी गावापासून पाच ते सहा किमी अंतरावर असणाऱ्या बेंढारवाडी जवळ असणाऱ्या घाटात दरड कोसळल्याने रस्त्यामध्ये माती आणि दगडाचा ढिगारा येऊन पडल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.

बेंढारवाडी येथील आदिवासी बांधव भातशेती बरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहे. त्यामुळे दररोज दूध ने आण करण्यासाठी दूधगाडी वस्तीवर येते. परंतु आता गुरुवार (ता. २५) रोजी रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने आदिवासी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरून दुधाच्या किटल्या डोक्यावर वाहून दूर रस्त्यावर आणाव्या लागत आहे.

तरी प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील दगड माती काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा तसेच पोखरी गावापासून बेंढारवाडी पर्यंत वाहून गेलेल्या रस्त्याची चांगल्या प्रकारे तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECP Pakistan: आता खोटं प्रतिज्ञापत्र चालणार नाही! निवडणूक आयोग नियम बदलणार; पाकिस्तानात नेत्यांची माहिती थेट तपासणार

Walur Helical Stepwell Revival: वालूरच्या ऐतिहासिक हेलिकल सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन वेगात; सेवावर्धिनी संस्थेच्या प्रयत्नांनी संवर्धनाला नवे बळ

Marathi News Live Updates : कपिल सिबल जे काही बोलत आहेत, ते काही अंतिम सत्य नाही - म्हस्के

Mumbai Local Women Coaches: मुंबई लोकलमध्ये सर्व महिला डबे एकत्र जोडण्याचा प्रस्ताव; कमी मनुष्यबळात अधिक प्रभावी सुरक्षा, ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चाही विचार

Paithan Village Protest: आडूळ ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रकरणात १५ दिवसांत चौकशीचा अहवाल देण्याचे लेखी आश्वासन; सचिन चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

SCROLL FOR NEXT