पुणे

कर्नाटकात डिसेंबरअखेर ग्रामपंचायत निवडणुका

CD

बंगळूर, ता. ९ : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका डिसेंबरअखेरपर्यंत घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांनी आज दिली.
ग्रामपंचायतींच्या प्रभाग निश्‍चितीबाबत हरकती नोंदविण्याची मुदत आठ मे रोजी संपली असून, निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यानंतर तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकाही टप्प्याटप्प्याने होतील, असे त्यांनी सांगितले. गुलबर्गा जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत बोलताना खर्गे म्हणाले की, पाणीपुरवठ्यासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. पाणीटंचाईग्रस्त २१ गावांमध्ये नवीन कूपनलिका खोदण्यात आल्या असून, चार गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच कोटींचा निधी देण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल. भीमा नदीतून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडे मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
कल्याण कर्नाटक प्रादेशिक विकास मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांना १७.३० कोटींचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आमदारांच्या अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन करण्यात आले असून, या समितीच्या निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याच्या कामांना गती दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SCROLL FOR NEXT