पुणे

गुन्‍हे बातम्‍या

CD

पॉलिसीची बतावणी करुन ८ लाखांना गंडा
पिंपरी ः पॉलिसीबाबत कस्‍टमर सर्व्हिसमधून बोलत असल्‍याची बतावणी करुन एका नागरिकाची तब्‍बल ८ लाख ७१ हजाराची फसवणूक झाली. रुपीनगर, चिखली परिसरात १ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्‍यान हा प्रकार घडला. अच्‍युत ज्ञानदेव ससाणे (वय ४५, रा. रुपीनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ससाणे यांना मोबाइलच्या माध्‍यमातून अनोळखी व्‍यक्‍तीचा कॉल आला. आयजीएमएस कस्‍टमर सर्व्हिसमधून बोलत आहे. तुमच्‍या पॉलिसीचे कागदपत्रे पाठवा, पैसे काढून देऊ, अशी बतावणी करुन पैसे भरण्‍यास सांगून फसवणूक केली.


वीज तोडल्‍यावरुन दगडाने मारहाण
पिंपरी ः सदनिकेची वीज तोडल्‍याच्‍या कारणावरुन दगडाने मारहाण झाली. सद्‍गुरू कॉलनी, भोसरी येथे सोमवारी (ता. २२) हा प्रकार घडला. या प्रकरणी परस्‍पर विरोधी तक्रार दाखल आहेत. विशाल परमेश्‍वर सुर्वे (वय २२, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. तर अजय चव्‍हाण, विजय चव्‍हाण या दोघांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सुर्वे यांनी सांगूनही सदनिका रिकामी केली नसल्‍याने वीज तोडली. त्‍या कारणावरुन दगडाने फिर्यादी व त्‍यांचा भाऊ आकाश सुर्वे यांना दगडाने मारहाण केली. तर, चव्‍हाण यांनी दिलेल्‍या फिर्यादीत म्‍हटल्‍याप्रमाणे शिवीगाळ केल्‍याचा कारण विचारण्‍यासाठी गेले असता आकाश सुर्वे, विशाल सुर्वे यांनी मारहाण केली.


रक्कम दुपटीचे आमिष, ३० लाखांची फसवणूक
पिंपरी ः रक्‍कम दुप्‍पट करण्‍याचे आमिष दाखवून एका ३३ वर्षीय तरुणाची ३० लाखांची फसवणूक केली. मोशी येथील केंद्रीय विहार परिसरात हा प्रकार घडला. प्रशांत सुरेश सपकाळ (वय ३३, रा. मोशी, मूळ - अहिल्‍यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. तर, इंस्‍ट्राग्राम आयडीधारक फोर रिबीट या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सपकाळ यांना इंस्‍ट्राग्रामवर गेमिंग व बेटिंगबाबत जाहिरात आली. त्‍याद्वारे दुप्‍पट रक्‍कम परत करण्‍याचे आमिष दाखवून तब्‍बल ३० लाख ८३ हजार ८२१ रुपयांची फसवणूक केली.


टास्‍कच्‍या नावाखाली सहा लाखांना गंडविले
पिंपरी ः टेलिग्राम नावाच्‍या समाज माध्यमातून वेगवेगळ्या टास्‍कद्वारे बोनस देण्‍याचे आमिष दाखवून ६ लाख ४८ हजाराची फसवणूक झाली. १९ ते २४ मे दरम्‍यान हा प्रकार घडला. लवीना कुलदीप रावल (वय २९, रा.रेल्‍वे गेटजवळ, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. तर, लक्ष्‍मी गुप्‍ता, अर्जुन सिंग कस्‍टमर सपोर्ट या नावाच्‍या प्रोफाईलवर गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांना टेलिग्राम खात्‍यावर वेगवेगळे टास्‍क पूर्ण करण्‍यासाठी बोनस, प्राॅफिट देतो, असे सांगितले. त्‍यानुसार वरील तिघांनी ६ लाख ४८ हजार ७४३ रक्‍कम जमा करण्‍यास सांगितली. मात्र, कोणताही परतावा न देता फिर्यादीची फसवणूक केली.

मारुंजीतून पिस्‍तुल जप्‍त
पिंपरी ः विनापरवाना पिस्‍तुलजवळ बाळगल्‍याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली. विक्रांत विकास येवले (वय २२, रा. पाचाणे, मावळ) याला अटक केली आहे. शिंदे वस्‍ती ते जगताप चौक यादरम्‍यान येत असलेल्या आरोपीकडे पिस्‍तूल असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍याची चौकशी केली असता, देशी पिस्‍तूल आणि २ काडतुसे पोलिसांनी जप्‍त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT