Police 
पुणे

Coronavirus : सावधान... तुम्ही स्वतःला फसवित आहात

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - गाडीला किंवा हातात पिशवी घेऊन किराणा, भाजीपाला, औषध आणायला चाललो असल्याचे खोटे सांगत नाकबंदीच्या ठिकाणाहून सुटका करून घेणारे स्वतः ला चतूर समजतात. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर पडणारे हे नागरिक पुन्हा रिकामीच पिशवी घेऊन घरी परततात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. मात्र, यातून हे नागरिक पोलिसांना नव्हे तर स्वतःलाच फसवित असल्याने त्यांना कोण सांगणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र संचारबंदीत प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सीमारेषेवर १३ ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. येथे २४ तास तपासणी केली जात आहे. शहरातून बाहेर जाणाऱ्यांना व येणार्‍यांना बंदी घातली आहे. तसेच सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी चार अशा ६३ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाच येथून  सोडले जात आहे. मात्र, काहीजण याचा गैरफायदा घेत आहेत. नागरिक भाजीपाला, किराणा, औषधे आणण्याच्या नावाखाली सहकुटुंब घराबाहेर पडत आहेत. एखाद्या कामासाठी एकाची गरज असाताना चौघे बाहेर पडत आहेत. मात्र, यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची अधिक भीती आहे.  याबाबत या नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येते.

अद्यापही अनेक नागरिक बेफिकीरीने हिंडत आहेत. किराणा, भाजीपाला, औषधे आणण्याच्या यला चालल्याच्या नावाखाली अनेक जण खोट बोलतात. मात्र, एका व्यक्तीमुळे अनेकांना संसर्ग होऊ शकतो, याची जराही भीती त्यांना नसते. 
- मनीष कल्याणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coastal Road Accident: कोस्टल रोडवर पोर्शे कारचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा; नेमकं काय घडलं? व्हिडिओ आला समोर

Argentina vs Spain Final: मेस्सी इतिहास रचणार की स्पेन करणार गेम? फायनलआधी समोर आली अशी आकडेवारी, जी बदलू शकते सर्व गणित!

Live Updates Marathi: एकनाथ शिंदे यांचा चंद्रभागेत नौकविहार

Lionel Messi: फुटबॉलच नव्हे तर जगभरातील सुपरस्टारही मेस्सीचे चाहते; विश्वचषक फायनलपूर्वी मेस्सीची जगभर चर्चा

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत खळबळ! शिंदेसेनेच्या महिला नेत्याला अटक, ३ जण फरार; नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT