पुणे

भादलवाडी तलावात ‘चित्रबलाकांचा’ किलबिलाट

CD

पळसदेव, ता. ९ ः इंदापूर तालुक्यातील ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन वारसा लाभलेला भादलवाडी तलाव सध्या परदेशी आणि स्थानिक पाहुण्यांच्या आगमनाने गजबजून गेला आहे. आकर्षक रंगांच्या चित्रबलाक पक्ष्यांनी या तलावातील बाभळीच्या झाडांवर आपली वसाहत स्थापन केली आहे.
सध्या हे पक्षी अंडी उबविण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहेत. लवकरच या घरट्यांमध्ये चिमुकल्या पिल्लांचा जन्म होणार असल्याने, तलावावरील किलबिलाट वाढणार आहे. काटेरी बाभळींवरील चित्रबलाकांची ही वीण पर्यटक व पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही चित्रबलाकांनी विणीच्या हंगामासाठी भादलवाडी तलावाची निवड केली आहे. पाण्याने वेढलेल्या काटेरी बाभळीच्या झाडांवर या देखण्या पक्ष्यांनी आपली घरटी विणली आहेत. सुरक्षित अधिवास आणि मुबलक खाद्यान्न उपलब्ध असल्याने हा तलाव चित्रबलाकांसाठी हक्काचे प्रसूतिगृह ठरत आहे. मादी पक्षाने घरट्यात २ ते ५ अंडी दिलेली आहेत. नर आणि मादी पक्षी आलटून- पालटून अंडी उबविण्याचे कर्तव्य पार पाडत आहेत. दरम्यान, उन्हाचा चटका वाढल्यानंतर एकमेकांना पंखाची सावली देण्याचे काम हे पक्षी करत आहेत. अंडी उबविण्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर काही दिवसांतच या घरट्यांमधून पिल्लांचा किलबिलाट ऐकू येईल. सुरुवातीला अत्यंत नाजूक असणारी ही पिल्ले परिसरातील पाणथळ जागांवर मिळणाऱ्या मुबलक खाद्यान्नाच्या जिवावर झपाट्याने मोठी होतील. आगामी तीन- चार महिन्यांत त्यांच्या पंखात बळ आले की चित्रबलाकांचा थवा आपल्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतात.

तलावातील पाणी पातळी टिकवून ठेवणे आणि झाडांचे जतन करणे या पक्ष्यांच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रालगतचा हा तलाव खऱ्या अर्थाने जैवविविधतेचा खजिना ठरत आहे.
- दत्तात्रेय लांघी, पक्षीनिरीक्षक

03361

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT