Bhagwat Karad and sunetra pawar sakal
पुणे

Baramati News : भागवत कराड यांनी बारामतीत घेतली सुनेत्रा पवारांची भेट....

शुक्रवारी (ता. 15) केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी बारामतीत लोकसभेच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सहयोग सोसायटी येथे सदिच्छा भेट घेतली.

मिलिंद संगई

बारामती - शुक्रवारी (ता. 15) केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी बारामतीत लोकसभेच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सहयोग सोसायटी येथे सदिच्छा भेट घेतली.

कराड हे सासवडवरुन मोरगाव येथे श्री मयुरेश्वराचे दर्शन घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप खैरे यांच्या शाळेमधील शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी गेले. सुनेत्रा पवार बारामतीतच असल्याची माहिती मिळाल्यानंतर भागवत कराड आवर्जून बारामतीत आले व त्यांनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या प्रसंगी अजित पवार यांचे चिरंजिव जय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर, भाजप पदाधिकारी दिलीप खैरे, अविनाश मोटे, मारुतराव वणवे, गोविंद देवकाते, आकाश कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांनी पुष्पगुच्छ देत कराड यांचे स्वागत केले. दोघांमध्ये आगामी निवडणूकीच्या संदर्भात अनौपचारिक चर्चाही झाली. अनेक वर्षानंतर भाजपच्या पदाधिका-यांनी आज अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानी हजेरी लावली. या मध्ये वासुदेव काळे, दिलीप खैरे, बाळासाहेब गावडे आदींचा समावेश होता.

सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असतील ही बाब स्पष्ट असल्याने आता भाजपच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्याशी संवाद वाढविला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता. 17) बारामतीत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे समन्वय बैठक घेणार असून त्यात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT