पुणे

वानवडीत चिमटा वस्तीत भीषण आग

CD

घोरपडी, ता. २०: भैरोबानाला येथील चिमटा वस्तीत दोन पत्र्याच्या खोल्यांना भीषण आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीत घरगुती वस्तूंसह रोख रक्कमही जळून गेल्याने कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

सकाळी अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. पत्र्याच्या खोल्या आणि दाट वस्ती असल्यामुळे आगीचा भडका उडाला. धुराचे लोट आणि ज्वाळा पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळविले.

माहिती मिळताच बी. टी. कवडे रस्ता अग्निशमन केंद्र, सेंट्रल फायर स्टेशन आणि कँन्टोन्मेंट अग्निशमन केंद्र येथून तीन अग्निशमन बंब आणि १५ ते २० जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्काळ पाण्याचा मारा सुरू करत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

या घरांमध्ये गॅसचे चार भरलेले सिलिंडर असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. सिलिंडरचा स्फोट झाल्यास संपूर्ण वस्तीत मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता धाडसाने हे चारही सिलिंडर बाहेर काढले. त्यांच्या या सतर्क आणि धाडसी कारवाईमुळे दाट लोकवस्तीतील मोठा अनर्थ टळला.

काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. तसेच आग शेजारील घरांमध्ये पसरण्यापासून रोखण्यातही यश आले.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. आगीत दोन्ही घरांतील फर्निचर, कपडे, घरगुती साहित्य व इतर वस्तू पूर्णपणे जळून गेल्या आहेत. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले. वेळेवर मिळालेल्या प्रतिसादामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT