पुणे

कास - म्हाते खुर्दच्या भैरवनाथाचा वार्षिक भंडारा भक्तिभावात संपन्न...

CD

श्री भैरवनाथाचा भंडारा
म्हाते खुर्दमध्ये उत्साहात


कास, ता.‌ २० ः म्हाते खुर्द (ता. जावळी) येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथाचा वार्षिक भंडारा महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. ५१ वर्षांची अखंड परंपरा जपत गावकऱ्यांनी धार्मिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
भंडाऱ्याच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, काकड आरती, तसेच दिंडी सोहळ्यात ग्रामस्थ, नातेवाईक आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यंदा ५१ व्या वर्षाचे औचित्य साधत सुप्रसिद्ध कलावंत योगेश चिकटगावकर यांच्या महाराष्ट्रातील विविध लोककलांवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक कलांचे सादरीकरण, लोकनृत्य, वेशभूषा आणि विनोदी शैलीतून सादर केलेले प्रबोधनात्मक सादरीकरण यामुळे कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ग्रामस्थांसाठी हा कार्यक्रम जणू सांस्कृतिक पर्वणीच ठरला. पिगंळा, भारुड अशा विविध प्रकारच्या महाराष्ट्राची ओळख असलेल्या लोककला जिवंत राहाव्यात, त्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे आणि मनोरंजनासोबत समाजप्रबोधन व्हावे, या उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला.
ग्रामस्थ मंडळ, नवयुग विकास मंडळ, नेहरू युवा मंडळ, भजन मंडळ, महिला मंडळ आणि नवयुग विकास पतसंस्था या गावातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहकार्याने हा धार्मिक-सांस्कृतिक वारसा पुढे नेला जात आहे. उपक्रमशील व प्रगत गाव म्हणून म्हाते खुर्दची ओळख असून, विविध क्षेत्रातील पुरस्कारांनी गावाला गौरविण्यात आले आहे, तसेच सुरू असलेल्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात गावाचा उल्लेखनीय सहभाग आहे.
गाव अव्वल स्थानी राहावे, सामाजिक ऐक्य टिकावे आणि परंपरा जपल्या जाव्यात, यासाठी सरपंच व ग्रामस्थ मंडळी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे विकास दळवी यांनी सांगितले.

------------------------------

B04593
म्हाते खुर्द : भैरवनाथाच्या वार्षिक भंडाऱ्यातील पालखी सोहळ्यात सहभागी ग्रामस्थ.
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT