पुणे

मंगळवेढ्यातील सामाजिक प्रश्नाला भैरवनाथची कायम मदत अध्यक्ष अनिल सावंत

CD

MGV26B16133
मंगळवेढा : मेंबर चषक क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक खंडाळा संघाला वितरित करताना अनिल सावंत व इतर मान्यवर.
---
समाजहितासाठी ‘भैरवनाथ’ची कायम मदत
अनिल सावंत; भाळवणी येथे क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २२ : भैरवनाथ परिवाराने साखर कारखानदारीबरोबरच तालुक्यातील विविध समाजहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने योगदान दिले आहे. भविष्यातही ही भूमिका कायम राहील, असे प्रतिपादन भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी केले.
तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित मेंबर चषक क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंधवे, जमीर इनामदार, पांडुरंग चौगुले, सरपंच लक्ष्मण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सीताराम भगरे, चंद्रकांत मोरे, शिवाजी दोडके, चारुदत्त पाटील, महादेव शिंदे, माजी सरपंच ज्ञानेश्वर भंडगे आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, दुष्काळी भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच परिसरातील अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न कारखान्यामुळे मार्गी लागला आहे. जलसंधारण, पारंपरिक खेळ आणि विविध सामाजिक उपक्रमांनाही भैरवनाथ परिवाराने नेहमीच पाठबळ दिले आहे. तालुक्यातील रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
स्पर्धेत कामसिद्ध क्रिकेट क्लब, खोमनाळ यांनी प्रथम, मेंबर इलेव्हन क्रिकेट क्लब, भाळवणी यांनी द्वितीय, माळवाडी क्रिकेट क्लब यांनी तृतीय तर शिवछत्रपती क्रिकेट क्लब यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना ट्रॉफी, रोख रक्कम व अन्य बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी भागवत वाडेकर, शंकर भगरे, ऋषीकेश इरकर, स्वप्नील शिंदे, गणेश कदम, दया माने, सिद्धेश्वर गायकवाड, सागर गिड्डे आणि ओंकार वाडेकर यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT