पुणे

आळंदीच्या आखाड्यात रंगल्या निकाली कुस्त्या

CD

आळंदी, ता. २२ : येथील भैरवनाथ महाराज उत्सवातील निकाली कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये एक नंबरच्या कुस्तीमध्ये युवा महाराष्ट्र केसरी प्रतीक देशमुख यांनी उत्तर महाराष्ट्र केसरी अक्षय पवार यांच्यावर मात केली. त्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर दोन नंबरच्या कुस्तीसाठी योगेश्‍वर तापकीर, मुन्ना पटेल यांच्यात लढत झाली. त्यात तापकीर चांदीच्या गदेचे मानकरी ठरले.
भैरवनाथ महाराज उत्सव निकाली कुस्त्यांचा आखाडा आळंदीतील फ्रुटवाले धर्म शाळेमध्ये शुक्रवारी (ता. २०) पार पडला. यावेळी ४२ कुस्त्यांच्या स्पर्धा पार पडल्या. एक नंबरसाठी झालेल्या कुस्तीस एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. नेत्रदीपक कुस्ती करीत प्रतीक देशमुख यांनी अक्षय पवार वर मात केली. तर आळंदीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय कुराडे यांच्या स्मरणार्थ ठेवलेल्या चांदीच्या गदेसाठी योगेश्‍वर तापकीर, मुन्ना पटेल यांच्या लढत होऊन तापकीर यांनी पटेल यांच्यावर मात केली. संपूर्ण कुस्ती स्पर्धा या गुणांकाने ठरविण्यात आल्या. कुस्ती पंच म्हणून काळूराम लोखंडे, विशाल थोरवे यांनी काम केले. आखाड्याचे नियोजन कार्तिक कुऱ्हाडे यांनी केले.
कुऱ्हाडे म्हणाले, ‘‘कुस्ती क्षेत्रात युवा वर्गाला वाव मिळावा यासाठी राज्यातील चांगल्या खेळाडूंना निमंत्रित करून आखाड्यामध्ये कुस्तीचे नियोजन केले होते. आळंदीकर ग्रामस्थांच्या आव्हानाला सुमारे ८४ मल्लांनी प्रतिसाद दिला. सर्व कुस्त्या या गुणांवर निकाली पार पडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

SCROLL FOR NEXT