Wanawadi to camp road sakal
पुणे

भैरोबा नाल्यावरील पूल पाडला; पर्यायी रस्ता सुस्थितीत नसल्याने नागरिक त्रस्त

वानवडीतील भैरोबा नाल्यावरील जुना पूल मागील आठवड्यात पाडण्यात आला. त्यामुळे वानवडीतून कॅम्पकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वानवडीतील भैरोबा नाल्यावरील जुना पूल मागील आठवड्यात पाडण्यात आला. त्यामुळे वानवडीतून कॅम्पकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

घोरपडी - वानवडीतील भैरोबा नाल्यावरील जुना पूल मागील आठवड्यात पाडण्यात आला. त्यामुळे वानवडीतून कॅम्पकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. याला पर्यायी मार्ग म्हणून गंगा सॅटेलाइट सोसायटीशेजारील रस्ता उपलब्ध करून दिला आहे , परंतु त्या रस्त्यावर डांबरीकरण केलेले नाही. तसेच पथदिवे नाहीत त्यामुळे प्रवास करताना नागरिकांचे हाल होत आहेत.

पुणे कॅन्टोमेंट आणि वानवडी परिसराला जोडणारा महत्वाचा पूल होता. साधारण दररोज रोज अडीच ते तीन हजार वाहनांची येथून ये- जा होत असे. पूल तोडल्याने सर्व वाहतूक पर्यायी मार्गवर वळवली आहे. परंतु डांबरीकरण नसल्यामुळे रस्त्यावरील खडी व धुळीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तसेच पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना नागरिकांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे रोज किरकोळ अपघात होत असून प्रशासन गंभीर अपघातांची वाट पाहत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मैथिली मथवडकर, स्थानिक रहिवासी -

मोहल्ला कमिटी मध्ये याबाबत खूप दिवस आधी सांगितले होते, पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण केल्याशिवाय पूल तोडू नये. परंतु मनपाने काम सुरू केले. जो पर्यायी मार्ग दिला आहे , त्याची स्थिती अतिशय वाईट असून गाडी चालवताना रस्त्यावरील दगड उडतात, ते इतर वाहनचालकांना लागून अपघात होऊ शकतो. डांबरीकरण व पथदिवे आवश्यक असून त्याचे तातडीने काम करावे.

किरण कलशेट्टी, कनिष्ठ अभियंता मनपा -

डांबरीकरण व पथदिवे याबाबत आम्ही मुख्य खात्याकडे मागणी केली असून लवकरच हे पूर्ण होईल.

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही रस्त्याचे काम केले जात नाही, त्यामुळे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये मोहल्ला कमिटीचे सदस्य, आजूबाजूच्या सोसायटीतील नागरिक आणि वानवडी मधील नागरिक सहभागी होतील असे सांगितले आहे. नागरिकांच्या वतीने मंगळवारी हे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच याबाबत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT