पुणे

भक्ती दीपक डाफळे यांना नवदुर्गा सन्मान

CD

भक्ती दीपक डाफळे यांना नवदुर्गा सन्मान
सातारा, ता. ३१ : येथील पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित सोहळ्यात हिंदू जनजागृती समितीच्‍या प्रा. भक्‍ती दीपक डाफळे यांना नवदुर्गा सन्मान २०२६ ने गौरवण्‍यात आले. धर्मप्रसार, हिंदू संघटन आणि समाजहिताच्या क्षेत्रांतील योगदानाबद्दल त्‍यांना हा सन्‍मान देण्‍यात आला. त्‍यांच्‍यासह जिल्ह्यातील आठ महिलांचाही येथे सन्‍मान करण्‍यात आला.
या सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, मुंबई येथील दक्षता व गुण नियंत्रण मंडळाच्या अधीक्षक अभियंता संध्या सापटणेकर यांच्‍या हस्‍ते हे सन्‍मान प्रदान करण्‍यात आले. यावेळी पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्‍यक्ष धनंजय देशमुख, दिलीप आफळे, विनायक चिकलगे, शिवाजीराव भोसले, प्रशांत तुपे, प्रेमचंद पालकर, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे जयंत देशपांडे यांच्‍यासह इतर मान्‍यवर उपस्‍थित होते. प्रा. भक्‍ती डाफळे या आध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक, हिंदू संघटन आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून भावना जागृत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भक्‍ती डाफळे यांनी, हा सन्मान आपले गुरुदेव आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी समर्पित करत असल्याचे सांगितले.

..............

61915
सातारा : भक्‍ती डाकळे यांचा सन्‍मान करताना प्रिया शिंदे. संध्‍या सापटणेकर. या वेळी प्रशांत तुपे, धनंजय देशमुग, दिलीप आफळे आदी मान्‍यवर.

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali offer FD: गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' बँकेकडून FD वर मिळणार भरघोस व्याज; ज्येष्ठ नागरिकांना तर ७.२० टक्क्यांपर्यंत परतावा

SHEHBAZ SHARIF: भारताला हरवताच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जल्लोष! शहबाज शरीफ यांनी केली अशी पोस्ट सोशल मीडियावर उडाली खिल्ली; नेमकं काय घडलं?

पारंपरिक पैठणीला दिला हटके टच, पण बोल्ड लूक पाहून नेटकऱ्यांचा संताप; मराठी अभिनेत्री ट्रोलिंगनंतर म्हणाली, ‘पैठणीचा अपमान...’

Marathi News Live Updates : पुणेकरांची प्रतीक्षा संपली! शिवाजीनगर ते मान-हिंजवडी मेट्रो लाईन-३ चे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्‍घाटन

सिंह राशीत गजकेसरी योग; ३ नोव्हेंबरपासून चमकणार 'या' राशींचे नशीब! मिळेल मान-सन्मान, मोठे पद अन् पैसा...

SCROLL FOR NEXT