Bhama Askhed Dam sakal
पुणे

Bhama Askhed Dam : भामा आसखेडमध्ये दीड टीएमसीची वाढ, मात्र साठा गेल्यावर्षी पेक्षा निम्माच

खेड, शिरूर, दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात आज (दि. २१) ४३.२५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

रूपेश बुट्टेपाटील

आंबेठाण - खेड, शिरूर, दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात आज (दि. २१) ४३.२५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा निम्म्याने कमी आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ८७.१४ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.

भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून ३०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सद्या शिवे, वहागाव, देशमुखवाडी, आंबोली, वांद्रा, कोळीये, आंभु, पाईट, पाळू, वाघू, तोरणे, आहिरे आदी भागात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणात मोठया प्रमाणात पाणीसाठा जमा होत आहे.

धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा ३.७९ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा हा ३.३२ टीएमसी इतका आहे.मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ८७.१४ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.

मागील वर्षीपासून धरणातून पुणे शहराच्या पूर्व भागासह तीर्थक्षेत्र आळंदीला पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच प्रचंड कडक असणाऱ्या उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता.त्यामुळे यावर्षी कमी पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

पुढील काळात पिंपरी चिंचवड शहराला देखील पाणी पुरवठा सुरू झाला तर धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही अशी चिंता या भागातील शेतकरी व्यक्त करीत आहे.

सध्या धरणाच्या परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने येवा मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सहाय्यक अभियंता (श्रेणी१) अश्विन पवार, शाखा अभियंता निलेश घारे-देशमुख, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT