Bhama Askhed Dam  Sakal
पुणे

Bhama Askhed Dam : भामा आसखेड मधील आवर्तन अखेर २८ दिवसांनंतर बंद

पाणी बंद पण अधिकारी म्हणतात चर्चा सुरू,अधिकारी नेमके कुणाच्या दबावात ?

रूपेश बुट्टेपाटील

आंबेठाण : २० मार्चपासून सुरू असणारे भामा आसखेड (ता.खेड) धरणातील आवर्तन तब्बल २८ दिवसानंतर बंद करण्यात आले आहे.या कालावधीत धरणातील पाणीसाठा २७ टक्केने कमी झाला आहे.एकीकडे पाणी बंद करण्यात आले असून दुसरीकडे मात्र अधिकारी म्हणतात की पाणी बंद करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

अनेक अधिकाऱ्यांकडे पाणी केव्हा बंद होणार ? याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कुणीही स्पष्टपणे बोलत नव्हते. यावरून अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव तर नाही ना ? असे जाणवत होते.

बरेच दिवस आवर्तन सुरू असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.धरणाच्या बुडीत क्षेत्रातील लोक आणि या पाण्यावर अवलंबून असणारे लोक यांच्या आक्रमक प्रतिक्रिया या आवर्तनाबाबत सुरू झाल्या होत्या.

सलग २८ दिवस आवर्तन सुरू असल्याने खेड तालुक्यातील पश्चिम भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवायला सुरुवात झाली होती.धरणाच्या काही बुडीत भागात तर जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली होती.याबाबत दैनिक सकाळने आज ( दि.१६ ) वृत्त प्रसिद्ध केले होते.

कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार दुष्काळजन्य परिस्थितीमुळे २० मार्च पासून आलेगाव पागापासून पुढे असणारे ७ बंधारे भरण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले होते. त्यासाठी धरणाच्या आयसीपीओ मधून १००० क्यूसेस वेगाने हे पाणी सोडणे सुरू होते.आलेगाव पागापर्यंत असणारे १८ बंधारे आणि पुढील ७ बंधारे या आवर्तनातून भरले जाणार होते.

आवर्तन बंद केव्हा होणार याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता बरेच अधिकारी याबाबत आमच्या वरिष्ठांशी बोला असे सांगत होते. यावरून अधिकाऱ्यांवर असणारा दबाव स्पष्टपणे जाणवत होता. मग तो दबाव नक्की कोणाचा ? असेल याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

याबाबत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाणी बंद करण्याबाबत चर्चा सुरू आहे,तुम्हाला कळवू असे सांगत अधिक बोलणे टाळले.

शरद बुट्टेपाटील ( भाजप,जिल्हाध्यक्ष )

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुनाले यांना संपर्क करून आवर्तन संपले तरी पाणी बंद का केले नाही ? याबाबत विचारणा केली.आणि तातडीने आवर्तन बंद करण्याच्या सूचना केल्या.कार्यकारी अभियंता यांनाही सांगितले.आणि जर तात्काळ पाणी बंद नाही केले तर आम्ही जावून बंद करू असा इशारा दिला होता.अजून उन्हाळ्याचे दोन महिने जायचे असून त्यासाठी पुरेसा पाणीसाठा ठेवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : जनगणनेला नकार देणाऱ्या ८०० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT