bharat band  sakal
पुणे

मार्केटयार्डात कडकडीत बंद; भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला सोमवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळ डिजिटल टीम

मार्केट यार्ड : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला सोमवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला बाजार, फुलबाजार, केळी बाजारात शंभर टक्के बंद पाळण्यात आला. मात्र गुळ- भुसार विभागातील व्यवहार मात्र सुरु होते. मार्केटयार्डातील विविध संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला होता.

बंदमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, तोलणार संघटना, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, टेम्पो पंचायत मार्केटयार्ड, भारतीय कामगार सेना आणि महाराष्ट्र टेम्पो संघटनांनी बंद जाहीर केला होता. त्याला श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनने पाठिंबा दिला. मार्केटयार्डातील फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, केळी व पान बाजार, तसेच फूलबाजारात आवक ठप्प झाली होती. भुसार बाजारात ग्राहक नसल्याने बहुतांश व्यापाऱ्यांनी दुपारनंतर दुकाने बंद केली होती. तर काही दुकानांमध्ये व्यवहार सुरू होते.

परराज्यातून काही फळांच्या गाड्या आल्या होत्या, त्यांना बंदबाबतची माहिती उशिरा मिळाली होती़ मात्र, माल उतरून घेतला आहे. त्याची विक्री मंगळवारी (ता. २८) करण्यात येणार आहे. कृषी विधेयकामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे़ त्यामुळे बाजारातील कामगार वर्गावर विपरित परिणाम होणार आहे. कृषी विधेयकांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये कामगार सक्रिय सहभागी झाले असल्याचे संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.

"मार्केट यार्डातील बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे या भूमिकेमुळेच पुकारलेल्या बंदला सर्वच संघटनांनी पाठिंबा दिला. कोणत्याही अडत्याने व्यापार केला नाही. कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मात्र परराज्यातून सफरचंदाची काही गाड्यांमधून आवक झाली आहे़ कारण, त्या गाड्या तीन ते चार दिवसांपूर्वीच निघाल्या होत्या त्यांना बंदबाबतची माहिती त्या वेळी मिळाली नव्हती मात्र, त्यांची विक्री उद्या करण्यात येणार आहे."- विलास भुजबळ, अध्यक्ष, अडते असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT