पुणे

नागठाणे काम बंद आंदोलन

CD

महामार्गाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

समस्यांकडे दुर्लक्ष; भरतगाव, भरतगाववाडीच्या ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

नागठाणे, ता. १३ : पुणे- बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम भरतगाव व भरतगाववाडी (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी बंद पाडले. पुलाची उंची वाढविण्यात यावी, पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करावा, या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथील ग्रामस्थांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला.
भरतगाव व भरतगाववाडी ही गावे महामार्गाच्या दोन्ही बाजूला आहेत. कमी उंचीच्या पुलामुळे येथील ग्रामस्थ, प्रवाशांना वेळोवेळी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: पावसाळ्यात पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे लोकांना ये- जा करणे जिकिरीचे ठरते. याबाबत ग्रामस्थ, दोन्ही ग्रामपंचायतीनी संबंधित अधिकाऱ्यांना गैरसोयीची माहिती दिली होती. पाठपुरावाही केला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलिसप्रमुखांना निवेदनही दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज आक्रमक पवित्रा घेत सहापदरीकरणाचे काम बंद पाडले. या वेळी संबंधित विभागाचे प्रकल्प व्यवस्थापकही उपस्थित होते.

चौकट
आंदोलनाचा इशारा
येत्या दिवसांत पुलाची उंची व रुंदीकरण न झाल्यास दोन्ही गावांतील ग्रामस्थ, तसेच ग्रामपंचायतींनी महामार्गावर ''रास्ता रोको'' आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तशा आशयाचे निवेदन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

छायाचित्र ओळी
08281
भरतगाव : महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम बंद करताना ग्रामस्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: 'त्या' औषधाचं गूढ वाढलं! अशोक खरात प्रकरणात SIT कडून दोन डॉक्टरांची चौकशी

Wardha News: ‘स्मार्ट’ वर्ध्याचा चेहराच विद्रुप; जागोजागी अवैध पोस्टरबाजी; लाखोंचा महसूल बुडाला

CM Meeting Decision Gokul Dudh: ‘गोकुळ’दूध संघावर प्रशासक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय, प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती

Washim News: कारंजा तालुक्यात सूर्याचा प्रकोप; तापमान ४३ अंशांवर; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात कणेरीवाडीत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT