पुणे

भाट्ये नारळ केंद्रला ''सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र'' पुरस्कार

CD

भाट्ये नारळ केंद्रला
‘सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार

रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या भाट्ये (रत्नागिरी) येथील नारळ संशोधन केंद्राला २०२५-२६ या वर्षाचा देशातील बागायती व उपवन पिकांमध्ये काम करणारा ''सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र'' म्हणून गौरवण्यात आले आहे. केरळ येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
भाट्ये येथील या संशोधन केंद्रावर गेल्या ७१ वर्षांपासून नारळ पिकावर निरंतर संशोधन सुरू आहे. यामध्ये मुख्यत्वे पीक सुधारणा, उत्पादन तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण (कीड व रोग नियंत्रण) या विषयांवर मोलाचे संशोधन कार्य केले जात आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत केरळमधील कासारगोड येथे ''अखिल भारतीय समन्वित उपवन पिके संशोधन प्रकल्प'' कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत देशातील सर्व संशोधन केंद्रांच्या कामाची वार्षिक आढावा सभा नुकतीच कासारगोड येथे पार पडली. या सभेत भाट्ये केंद्राने सादर केलेल्या संशोधन आधारित निष्कर्ष, नवीन तंत्रज्ञान आणि विस्तार कार्याचा आढावा घेऊन या केंद्राला देशपातळीवर सर्वोत्कृष्ट म्हणून घोषित करण्यात आले. या सभेत नारळाच्या विविध वाणांच्या बहुस्थानी चाचण्या, उत्पादन तंत्र, आंतरपिके आणि पीक संरक्षण या विषयांवरील सादरीकरण करण्यात आले होते.
-------
कोट
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे आणि संबंधित विभागप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली भाट्ये केंद्राचे संशोधन कार्य अविरत सुरू आहे. हा राष्ट्रीय बहुमान म्हणजे संपूर्ण टीमच्या ७१ वर्षांच्या सातत्यपूर्ण संशोधन कार्याची पोचपावती आहे.
- डॉ. किरण मालशे,
केंद्रप्रमुख, भाट्ये नारळ संशोधन केंद्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Lohgad Case : सिया, चेतनच्या प्रेमाबाबत भावाचा पोलिसांकडे खुलासा, लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; साहिल गोयलची कसून चौकशी

Army Jawan Success : जिद्द असावी तर अशी! निवृत्तीनंतर साताऱ्याच्या माजी सैनिकानं एकाच वर्षात 'क्रॅक' केल्या तब्बल 12 सरकारी परीक्षा; एकामागून एक कशा दिल्या Exam?

Latest Marathi News Live Update : राममंदिरात दानचोरी आणि जमीन गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्षांच्या राजीनाम्याची शक्यता

Pune Traffic Update : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर पडला बंद; वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा, प्रवाशांना कोंडीचा नाहक त्रास

Panvel: निरागस लेकरावर निर्दयी अत्याचार! अंगणवाडीत जाण्यास नकार; मुलीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारले, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT