भाटनगर 
पुणे

भाटनगर चौकात बेशिस्तीमुळे रोजच कोंडी 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "येऽ चल, मागे घे गाडी, दिसत नाही का?', "अरे, तूच मध्ये घुसलाय, ते बघ आधी,' हा संवाद रिक्षाचालक आणि दुचाकीस्वारामध्ये सुरू असतानाच, हॉर्न वाजवून "ओ काका, थोडी पुढे घ्या,' असे म्हणत एका तरुणाने पदपथावर दुचाकी चढवली आणि निघून गेला. अन्य वाहनचालकांनी जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली. अखेरीस दोन तरुणांनीवाहतूक नियंत्रकाचे काम बजावून चौक मोकळा केला.

पिंपरी- चिंचवड लिंक रस्त्यावर भाटनगर येथील चौकात बुधवारी (ता. 6) दुपारी दोनच्या सुमारास घडलेला हा प्रसंग, वाहतूक कोंडीचे गांभीर्य सांगून गेला. पिंपरी- चिंचवड लिंक रस्ता नेहमी वर्दळीचा. विशेषतः पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाण पुलावरून चिंचवडकडे जाण्यासाठी दुहेरी मार्ग. मात्र, दुभाजक नसल्याने कुणी, कसेही वाहने चालवतात. पूल संपतो त्या ठिकाणीच चौक असल्याने पिंपरी कॅम्पातील मुख्य बाजारपेठेचा रस्ता, रिव्हर रोड व लिंक रस्ता तीनही बाजूने वाहने येथे एकवटतात. लोहमार्गालगत असलेल्या वस्तीतून येणारी वाहने वेगळीच. या परिसरात किराणा व भुसार मालासह अन्य वस्तूंच्या घाऊक व्यापाऱ्यांची दुकाने व गोदामे आहेत. त्यामुळे वाहनांची नेहमीच गर्दी असते. प्रत्येक वाहनचालक आपले वाहन दामटण्याचा प्रयत्न करतो. परिणामी, वादाला तोंड फुटते. त्यातून कोंडी वाढत जाते. असाच प्रसंग बुधवारी दुपारीही बघायला मिळाला. 

वाहतूक पोलिस, वॉर्डन नियुक्त 
भाटनगर येथील चौकात सकाळी व सायंकाळी वाहनांची अधिक वर्दळ असते, त्या वेळी मात्र येथे वाहतूक नियंत्रक पोलिस व वॉर्डन आवर्जून नियुक्त केले जातात, असे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात दुसऱ्या दिवशीही वाढ,चांदीही चकाकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

The End of a Golden Era: नव्या पर्वाची पहाट! एका सुवर्णयुगाचा अस्त अन् फुटबॉलच्या नव्या ताऱ्यांचा उदय

Live Updates Marathi : नीट प्रश्नपत्रिका फुटीवर पंतप्रधानांचा मोठा दावा; दोषींवर तातडीची कारवाई झाल्याचे विधान

Satara News: जावळीत खळबळ! उपसभापती गोरख महाडिक यांना अटक, न्यायालयात केलं हजर, धक्कादायक माहीती आली समाेर..

Ratnagiri To Mumbai Seaplane Project : रत्नागिरी ते मुंबई प्रवास आता थेट हवेतून आणि पाण्यावरून! पालकमंत्री उदय सामंत यांचा ड्रीम प्रोजेक्ट; पाहा काय आहे प्लॅन

SCROLL FOR NEXT