पुणे

भाळवणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून बंद; भाळवणीत पाच दिवस आड पाणी पुरवठा

CD

वास्तव वेध
भाळवणी जिल्हा परिषद गट
---
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून बंद
पाच दिवसांआड पाणी; ग्रामीण रुग्णालय, रस्ते दुरुस्ती, शिक्षक भरतीची मागणी
भारत नागणे : सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २३ : भाळवणी जिल्हा परिषद गटातील गावांसाठी जीवनदायी ठरलेली भाळवणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील काही वर्षांपासून देखभाल व दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या उपरी, पळशी व सुपली या गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, भाळवणी गावालाही पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या केंद्राची श्रेणीवाढ करून ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, यासाठी माजी पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अद्याप आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
भाळवणी-गार्डी, भाळवणी- तोंडले आणि भाळवणी- शेंडगेवाडी या प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली असून, रस्ते दुरुस्त करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा योजनाही अपूर्ण अवस्थेत आहे. पाण्याची टाकी उभारण्यात आली असली तरी पाइपलाइनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
भाळवणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस १९९५ मध्ये तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री अर्जुन खोतकर यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली होती. सुरवातीच्या काळात योजना सुरळीत सुरू होती. मात्र, वाढलेली पाणीपट्टी आणि तांत्रिक त्रुटींमुळे योजना बंद पडली. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ती पूर्णपणे ठप्प आहे.
भाटघर धरणातून मिळणाऱ्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही कायम आहे. टेल टू हेड पद्धतीने शेतीसाठी पाणीपुरवठा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय शेतीपंपांना नियमित वीजपुरवठा होत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे.
प्राथमिक शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे. तसेच अनेक अंगणवाड्या व शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहे उभारावीत, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
दरम्यान, भाळवणी गावातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. साखर कारखान्याकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी गावाबाहेरून बायपास रस्ता उभारण्याची मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.
----
कोट
UPR26B08171
भाळवणी जिल्हा परिषद गटातील रस्ते, वीज, पाणी यांसारखे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शेतीपंपांसाठी किमान आठ तास वीजपुरवठा मिळावा यासाठी जिल्हा परिषद बैठकीत मागणी केली आहे. भाळवणी पाणीपुरवठा योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असून, आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
- सुप्रिया गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य
---
कोट
UPR26B08170
भाळवणी गणातील अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे; ती वाढविण्याची मागणी केली आहे. तसेच शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला असून, भाळवणीत गतिरोधक बसविण्याबाबत राज्य रस्ते विकास मंडळाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- विजय शिंदे, पंचायत समिती सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Latest Marathi News Live Update : खासदारांचे ऑपरेशन टायगर यशस्वी, सर्व ६ खासदार खूश : एकनाथ शिंदे

Male Fertility Warning: पुरुषांनो सावधान! ताण, अपुरी झोप आणि 'या' सवयींमुळे होऊ शकतो तुमच्या fertility वर परिणाम

SCROLL FOR NEXT