पुणे

भवानी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

CD

घोरपडी, ता. १७ : तुळजापूरच्या देवीचे दर्शन पुण्यातच घ्यायचे असेल, तर भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अडीचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. नवरात्रोत्सवात येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. धार्मिक परंपरेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्याची परंपराही या मंदिराने जपली आहे. ‘पुण्याचे तुळजापूर’ ओळख असणारे हे मंदिर अनेक भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचे केंद्र बनले आहे. १७६० मध्ये तुळजापूरच्या भवानी देवीच्या धर्तीवर या मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील भवानी मातेची अडीच फूट उंचीची चार हातांची मूर्ती आहे. मंदिराची देखभाल मेढेकर कुटुंबीयांकडून केली जाते.

नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
नवरात्रोत्सवात महिलांकडून ललित सहस्रनामाचे सामूहिक पठण आणि श्रीसूक्ताचे पठण केले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीची पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. फडके हौद येथून सुरू होणारी ही मिरवणूक शिवाजी रस्ता, बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक, बोहरी आळी आणि गोविंद हलवाई चौक या मार्गाने पुन्हा मंदिरात येते.

धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी
लहान मुलांसाठी वैद्यकीय शिबिर, रक्तदान शिबिर आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, देवीसाठी आलेल्या साड्यांचे वारीच्या वेळी वाटप असे उपक्रम राबविले जातात. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भक्तीचा अनुभव देतानाच धार्मिक परंपरा आणि सामाजिक बांधिलकी यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम भवानी माता मंदिर करीत आहे, अशी माहिती नरेंद्र मेढेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Gangapur News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; गंगापूरमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

Latest Marathi News Live Update : ग्राहक महिलेने लांबविले मंगळसूत्र श्रीरामपूर येथील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT