bhavani peth golden jubli institute caught fire
bhavani peth golden jubli institute caught fire  sakal
पुणे

Pune Fire Accident : भवानी पेठ गोल्डन ज्युबली इन्स्टिट्यूट येथे आग

मोहिनी मोहिते

कँटोन्मेंट - भवानी पेठ कासेवाडी भागात गोल्डन ज्युबली इन्स्टिट्यूट येथे आग लागल्याची घटना आज दिनांक २४ रोजी दुपारी 4च्या सुमारास घडली. यावेळी दुपारी 4:38 वाजता अग्निशमन दलाला नियंत्रण कक्षातून आग लागल्याची वर्दी मिळताच दलाच्या मुख्यालयातून एक फायरगाडी व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आले.

या इन्स्टिट्यूट येथे मुलांचे वसतीगृह आहे. इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये असणाऱ्या वसतिगृहात दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 4 मध्ये आग लागली होती. जवानांनी तातडीने श्वसनाचे उपकरण (बी ए सेट) आगग्रस्त खोलीमध्ये कोणी विद्यार्थी अडकले नसल्याची खाञी करत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला.

सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवत पुढील धोका दुर केला. आगीमध्ये कोणीही जखमी नसून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीमध्ये गाद्या,बेंच, पंखे व इतर जीवनावश्यक वस्तु जळाल्याने नुकसान झाले.

या कामगिरीत अग्निशमन दलाचे वाहनचालक अतुल मोहिते, दत्तात्रय वाघ, तांडेल मंगेश मिळवणे, जवान आझीम शेख, सागर ठोंबरे, अजय कोकणे, किशोर कारभाळ, मयुर ढुबे, संकेत सरडे, सागर शिर्के यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT