पुणे

भवानी पेठेत हळदी-कुंकु कार्यक्रमात गोंधळ

CD

भवानी पेठेत हळदी-कुंकू कार्यक्रमात गोंधळ
नागेश वल्याळ यांच्यासह दोन्ही गटांतील ३४ जणांवर गुन्हा

सोलापूर, ता. २८ : भवानी पेठेतील नीलकंठ समाज संस्थेच्या बहुउद्देशीय मंगल कार्यालयात गुरुवारी (ता. २७) रात्री हळदी-कुंकू कार्यक्रमादरम्यान दोन गटांत वाद झाला. याप्रकरणी दोन्ही गटांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या. त्यावरून दोन्ही गटांतील ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात नागेश वल्याळ यांचाही समावेश आहे.

भवानी पेठेतील नीलकंठ महिला मंडळाचे श्रीनिवास कालवा हे माजी अध्यक्ष आहेत. संस्थेचे विश्वस्त अंबादास रायनी व राजाराम बोगयागारू यांच्यात वाद सुरू असून, यासंदर्भातील दावे दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय तसेच धर्मादाय आयुक्तांकडे सुरू आहेत.
विजयालक्ष्मी कालवा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे पती श्रीनिवास यांना नागेश वल्याळ, प्रकाश मरगळ व शेखर स्वामी हे मारहाण करीत असल्याची माहिती त्यांच्या भावाने दिली. त्यानंतर त्या घटनास्थळी गेल्या असता संबंधितांनी त्यांनाही शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या फिर्यादीवरून नागेश वल्याळ, राजाराम बोगयागारू, संदिप वल्याळ, शेखर लिंगय्या इराबत्ती, श्रीनिवास चिरंची, प्रकाश मरगळ, रामलू जिट्टा, श्रीहरी इराबत्ती, रमेश वल्याळ, श्रीनिवास गोंड्रा, अशोक मरगळ व श्रीनिवास वल्याळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या फिर्यादीत शिल्पा शेखर इराबत्ती यांनी म्हटले आहे की, कार्यक्रम सुरू असताना अंबादास रायनी, श्रीनिवास कालवा, नरसिंग इराबत्ती यांच्यासह इतरांनी ‘येथे कार्यक्रम करायचा नाही’ असे म्हणत शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून येथून निघून जाण्याची दमदाटी केली. या भांडणात तीन तोळ्यांचे मंगळसूत्र काढून घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर नागेश वल्याळ, शेखर इराबत्ती व प्रकाश मरगळ यांना बोलावून घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या फिर्यादीवरून अंबादास रायनी, श्रीनिवास कालवा, नरसिंग इराबत्ती, शिवाजी आब्बतिनी, शेखर दुबय्या इराबत्ती, शंकर आल्लम, विजयालक्ष्मी कालवा, सविता इराबत्ती, लिंगराज रायनी, राकेश रायनी, सपना इराबत्ती, बालमणी रायनी, अंबादास इराबत्ती, राजू गुंडळा, विक्रम इराबत्ती, नागनाथ आब्बतिनी, मधुकर अल्लम, गणेश गुंडळा, निलकंठ आब्बतिनी, अंबुबाई रायनी, बालमणी अल्लम व भारती गुंडळा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही फिर्यादींवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTAच्या कारभारात मोठा बदल; IAS-IPS सह ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती, ३ आठवड्यांत रुजू होण्याचे आदेश, केंद्राचा महत्त्वाचा निर्णय

Bangladeshi Infiltrators Arrested : पुण्यात तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; विशेष शाखा व लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

Nepal Flood Viral Video: नेपाळमधील महापुरात 'ते' एकच घर कसं अभेद्य राहिलं? पुढे काय झालं? सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Nepal Flood: महापुराने संपूर्ण शहर वाहून नेलं, पण संकटाची चाहूल आधीच होती; नेपाळला दिलेला इशारा का दुर्लक्षित झाला?

राखीच्या धाग्याने बांधलं आपुलकीचं नातं; डोंबिवलीत हजारो भगिनींसोबत रविंद्र चव्हाण यांचा रक्षाबंधन सोहळा

SCROLL FOR NEXT