गरवारे महाविद्यालय - भय्याजी जोशी यांचा सन्मान करताना  डॉ. रघुनाथ माशेलकर. या वेळी (डावीकडून) जयसिंह मरीवाला, डॉ. माशेलकर, जोशी आणि डॉ. अशोक कुकडे.
गरवारे महाविद्यालय - भय्याजी जोशी यांचा सन्मान करताना डॉ. रघुनाथ माशेलकर. या वेळी (डावीकडून) जयसिंह मरीवाला, डॉ. माशेलकर, जोशी आणि डॉ. अशोक कुकडे. 
पुणे

किशाभाऊंमुळे स्व-रूपवर्धिनीचा वटवृक्ष - भय्याजी जोशी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘किशाभाऊ हा काही शब्दांमध्ये मावणारा माणूस नाही. ते अनेकांचे पालक होते, मार्गदर्शक होते. प्रेरक आणि मित्रही होते. त्यांच्या जीवनाला कुंपण नव्हते. ते मळलेल्या वाट्याने गेले नाहीत, तर स्वत:ची वाट निर्माण केली,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.

उपेक्षित गटातील बुद्धिमान विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी चार दशके काम करणाऱ्या स्व-रूपवर्धिनीचे संस्थापक किशाभाऊ ऊर्फ कृष्णाजी लक्ष्मण पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक जयसिंह मरिवाला, ज्ञानप्रबोधिनीचे गिरीश बापट, राम डिंबळे, उदय गुजर, डॉ. अशोक कुकडे, लीना मेहेंदळे, मोहन गुजराथी, शिरीष पटवर्धन, ज्ञानेश पुरंदरे आदी या वेळी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, ‘‘किशाभाऊंनी काम सुरू केले त्या वेळी त्यांच्याकडे काहीच साधने नव्हती. त्यांच्याकडे केवळ मन:शक्ती आणि संकल्पशक्ती होती. त्यानुसार ते चालत राहिले. म्हणूनच, आज स्व-रूपवर्धिनीचा वटवृक्ष झाला आहे. मुलांना ज्ञान देण्याबरोबरच त्यांनी संस्कारांची जोड दिली. चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीसाठी ही सावधानता त्यांनी कायम बाळगली.’

डिंबळे यांनी जन्मशताब्दी वर्षातील कार्यसंकल्पाची माहिती या वेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT