Bhide Bridge CLose sakal
पुणे

Bhide Bridge: भिडे पूल झाला बंद! खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. खडकवासला धरण भरल्याने पाटबंधारे विभागाकडून बुधवारी सकाळी सात वाजता नदीपात्रात ९ हजार ४१६ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. परिणामी डेक्कन परिसरातील नदीपात्रात रस्त्यावर पाणी आल्यामुळे भिडे पूल आणि लगतच्या रस्त्यांवरील वाहतूक बुधवारी (ता. २४) दुपारनंतर बंद करण्यात आली आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. खडकवासला धरण भरल्याने पाटबंधारे विभागाकडून बुधवारी सकाळी सात वाजता नदीपात्रात ९ हजार ४१६ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे डेक्कन परिसरात नदीपात्रातील रस्त्यावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाणी आले.

त्यानंतर पोलिसांनी नारायण पेठेतून भिडे पुलावरून डेक्कनकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड॒स लावून वाहतूक बंद केली. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, वाहनचालकांनी डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी पूलमार्गे जावे, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा -

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे नदीपात्रातील रस्त्याच्या कडेला लावलेली वाहने काढावीत. तसेच, नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT