पुणे

भिगवण येथे परीक्षार्थींचे मिठाई देऊन स्वागत

CD

भिगवण, ता. २० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून (ता. २०) येथील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय केंद्र व भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोंडिराम सदाशिव क्षीरसागर विद्यालय या परिक्षा केंद्रावर सुरळीत सुरुवात झाली. पहिल्या पेपरसाठी आलेल्या मुलांचे गुलाबपुष्प व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय केंद्रामध्ये ४४८ विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती केंद्र संचालक डी. डी. खराटे यांनी दिली आहे. यामध्ये भैरवनाथ विदयालय, भिगवण, विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल भिगवण, आदर्श माध्यमिक विद्यालय भिगवण, दत्तकला इंटरनॅशनल स्कूल स्वामी चिंचोली (ता. दौंड) एल. जी. बनसोडे विद्यालय, पळसदेव व ब्राईट फुचर स्कूल खडकी येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर येथील भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोंडिराम सदाशिव क्षीरसागर विद्यालयांमध्ये ३४० विद्यार्थी परिक्षा देत असल्याचे केंद्र संचालक अविनाश नरुटे यांनी सांगितले. यामध्ये कोंडिराम सदाशिव क्षीरसागर विद्यालय, श्रीराम विद्यालय, स्वामी चिंचोली, भैरवनाथ विद्यालय खडकी, सरस्वती विद्यालय रावणगाव, राजेश्‍वर विद्यालय राजेगाव (ता. दौंड), लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय खेड (ता. कर्जत) या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दोन्ही केद्रांमध्ये कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत येथील संपूर्ण केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. परीक्षार्थींना योग्य वातावरणात पेपर देता यावा यासाठी उत्तम प्रकाश योजना, वर्गांमध्ये पंखे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा केंद्रामध्ये केली आहे. विद्यार्थ्यांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी येथील भिगवण पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT