भीमा कोरेगाव शौर्य दिन sakal
पुणे

भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा करणार

गतवर्षी कोरोनामुळे उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भीमा कोरेगाव शौर्य दिन येत्या एक जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. याठिकाणी अभिवादनासाठी येणाऱ्या भीम अनुयायांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झाल्याची माहिती भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्यावतीने देण्यात आली.

गतवर्षी कोरोनामुळे उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. यंदा कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, याबाबत भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने बैठका घेण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये तहसीलदार आणि सहायक पोलिस आयुक्त यांच्यासमवेत इतर सर्व विभागाचे अधिकारी आणि आंबेडकर समाजातील पक्ष संघटनांची संयुक्त बैठक नुकतीच पार पाडली. या वेळी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाकडून पिण्याचे पाणी, पार्किंग, वाहतूक सुविधांची माहिती देण्यात आली.

भीमा कोरेगांव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून सरकारच्यावतीने अभिवादन करावे, याबाबतचे निमंत्रण भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्यावतीने देण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षाच्या अभिवादन सभा, आंबेडकरी साहित्य विक्रीचे स्टॉल याचाही कार्यक्रमात समावेश राहणार आहे. दरम्यान, भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी या वेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT