Ajay Singh Sengar
Ajay Singh Sengar 
पुणे

Bhima Koregaon Shaurya Din : विजय स्तंभाबद्दल आक्षेपार्ह विधान भोवलं! करनी सेना प्रमुखावर गुन्हा दाखल

Amit Ujagare (अमित उजागरे)

Bhima Koregaon Shaurya Din 2023 : दरवर्षी १ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव इथं विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. या कार्यक्रमावर आक्षेप घेणाऱ्या आणि आक्षेपार्ह विधान करणाऱ्या करनी सेनेच्या अजयसिंह सेंगर यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bhima Koregaon Shaurya Din Offensive statement FIR registered against Karni Sena chief Ajaysingh Sengar)

UGC NET 2023 : नेट परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधीपासून सुरु होतील परीक्षा

पोलिसांच्या माहितीनुसार, करनी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांच्याविरोधात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेंगर यांनी विजयस्तंभ पाडून टाका आणि दलित सैनिकांना गद्दार म्हणून संबोधलं होतं. त्यामुळं सेंगर यांच्याविरोधात विजयस्तंभ अभिवादन दिन समनव्यक राहुल डंबाळे यांनी फिर्याद दिली होती.

काय म्हणाले होतं सेंगर?

करनी सेनेचे अजय सेंगर यांनी साम टिव्हीवर आपली भूमिका मांडताना म्हटलं होतं की, "इंग्रजांकडून लढलेल्या गद्दार भारतीयांचा शौर्यदिन या देशात साजरा कसा काय होतो. राज्याचे मुख्यमंत्री हे कसं काय सहन करतात. आम्ही करनीसेनेच्यावतीनं १ जानेवारी रोजी इंग्रजांविरोधात इथं जे भारतीय लढले त्यांच्यासाठी श्रद्धांजली सभा घेणार आहोत. कारण गद्दार भारतीयांना अभिवादन करण्यासाठीचा कार्यक्रम कोरोगाव भीमा इथं होतो. या कार्यक्रमावरे बंदी टाकावी अशी मागणी आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे"

प्रकाश आंबेडकरांनी दंगली व्हाव्यात यासाठी कार्यक्रम सुरु केला - सेंगर

"देशामध्ये गद्दारांचा सन्मान होता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. या देशासाठी प्राणाचं बलिदान ज्यांनी दिलं आहे. त्यांचा हा एकप्रकारे अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. कोरोगाव भीमा येथील विजयस्तंभ उभारण्यात आला आहे हा सरकारनं बुलडोझर लावून पाडला पाहिजे. हिंदू आणि बौद्ध हे भाई-भाई आहेत यांच्यातील संबंध बिघडवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. ही प्रथा चालू केली आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी. आपली राजकीय चूल पेटवण्याकरता त्यांनी हिंदू आणि बौद्धांमध्ये दंगली निर्माण व्हाव्यात हा त्यांचा हेतू आहे" असा आरोपही सेंगर यांनी केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT