पुणे

खानापूर बंधाऱ्यावरील प्रवास जीवघेणा; पुरात भराव वाहून गेल्याने धोका वाढला

CD

JEU26B08258
खानापूर (ता. अक्कलकोट) ः भराव नसल्याने दोन फूटी कट्यावरून जाताना तोल जाऊन उजव्या बाजूला पाच फूट खड्यात पडून बचावलेले दुचाकीधारक.

भराव वाहून गेल्याने खानापूर बंधाऱ्यावरील प्रवास जीवघेणा
दोन्ही बाजूंना मोठे खड्डे; नागरिकांच्या जीवितास धोका

अक्कलकोट, ता. १९ : तालुक्यातील खानापूर येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याला जोडणारा महाराष्ट्र अन् कर्नाटक या दोन्ही बाजूंचा भराव पुराच्या पाण्याच्या वेगाने वाहून गेल्याने बंधाऱ्यावरून होणारा प्रवास धोकादायक बनला आहे. या बंधाऱ्यावरून खानापूरसह परिसरातील शेतकरी अन् नागरिक दुचाकी, सायकल तसेच पायी नियमितपणे ये-जा करतात. मात्र, भराव वाहून गेल्याने सिमेंटच्या कट्ट्यावरून वाहन चालविताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राच्या बाजूला बंधारा सुरू होतो, त्या ठिकाणी सुमारे तीन फूट खोल अन् २० फूट रुंद, तर कर्नाटक हद्दीला जोडणाऱ्या ठिकाणी सुमारे पाच फूट खोल अन् १५ फूट रुंद भराव पुराच्या तडाख्यात वाहून गेला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंना मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. वाहनाचा किंवा पादचाऱ्याचा तोल गेल्यास एका बाजूला थेट नदीच्या पाण्यात, तर दुसऱ्या बाजूला खोल खड्ड्यात पडण्याची शक्यता आहे.
बंधाऱ्यावरून दररोज होणारी नागरिकांची वर्दळ लक्षात घेता संबंधित पाटबंधारे विभागाने तातडीने पाहणी करून वाहून गेलेला भराव भरावा अन् अपघाताचा संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी ग्रामस्थ अन् शेतकऱ्यांकडून होत आहे.

कोट
- भराव वाहून गेल्यामुळे सिमेंटच्या कट्ट्यावरून प्रवास करताना नागरिकांच्या जीवाला धोका आहे. नुकताच एक मोटारसायकलस्वार उजव्या बाजूच्या खड्ड्यात पडला; सुदैवाने तो थोडक्यात बचावला. संबंधित पाटबंधारे विभागाने तातडीने पाहणी करून दोन्ही बाजूंचा भराव भरून बंधारा सुरक्षित करावा.
- रविकांत कुरे, भीमा काठ शेतकरी, खानापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन यांना, इतर चौघांसह १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राऊस ॲव्हेन्यू न्यायालयातून नेले

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT