बावडा, १० : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘भीमा नदी बचाव कृती समिती’ आणि बावडा परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देत मंगळवारपर्यंत (ता. १३) उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. भीमा नदीत पाणी सोडून बंधारे पूर्ण क्षमतेने न भरल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जलसंपदा विभागाला दिला आहे.
बावडा व सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर असलेल्या गावांत पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा आणि वाळलेल्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरण १०० टक्के भरूनही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इतिहासात प्रथमच उजनी धरण ते नरसिंहपूर भागातील भीमा नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्यामुळे सुरेश शिंदे, धैर्यशील पाटील, विद्यासागर घोगरे, ज्ञानदेव बागल, हरिभाऊ बागल, अशोक मगर, राजेंद्र (उमेश) सूर्यवंशी, तुकाराम घोगरे, उमेश पाटील आदी
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नदीकाठावरील १५ ते १६ गावांची पाणीपुरवठा व्यवस्था ही पूर्णपणे भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. उजनीतून पाणी न सोडल्यास १३ ऑक्टोबरनंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही यात देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.