पुणे

बेंद ओढ्यात पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग; केम येथे भीमा-सीना बोगद्याच्या परिसराचे सर्वेक्षण पुर्ण

CD

KRU26B02808
केम (ता. करमाळा) बेंद ओढ्याला पाणी सोडण्यासाठी सर्वेक्षण करताना टीम.

भीमा-सीना जोड कालव्याच्या शाफ्ट-३चे सर्वेक्षण
बेंद ओढ्यात पाणी सोडण्यच्या हालचालींना वेग; १८५ मीटर अंतराची निश्चिती

कुर्डू, ता. ७ : केम हद्दीतील भीमा-सीना जोड कालव्याच्या बोगद्यातील शाफ्ट क्रमांक ३ मधून पाणी उपसा करून ते बेंद ओढ्यात सोडण्यासाठीचे तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशानुसार एका खासगी संस्थेकडून हे सर्वेक्षण करण्यात आले.
केम हद्दीतील भीमा-सीना बोगद्याच्या शाफ्ट क्रमांक ३ची खोली २४० फूट आहे. या शाफ्टमधून पाणी उपसा करून बोगद्यापासून १८५ मीटर अंतरावर बेंद ओढ्याच्या सुरवातीला सोडण्याचे नियोजन आहे. या १८५ मीटर अंतराची सॅटेलाईट मॅपद्वारेही निश्चिती करण्यात आली आहे.
या कामासाठी सोलापूर येथील व्हीबी असोसिएट्स या सर्वेक्षण कंपनीचे अमोल वाघमारे अन् गुरू वाघमारे यांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासोबत सेवानिवृत्त अभियंता करडे अन् सूर्याजी पाटील यांनीही तांत्रिक पाहणीत सहभाग घेतला.
---
आमदारांच्या पाठपुराव्याला यश
बेंद ओढ्यात पाणी सोडण्याच्या प्रश्नावर माढ्याचे आमदार अभिजित पाटील अन् करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी मंत्रालयात बैठक घेतली होती. या बैठकीत केलेल्या पाठपुराव्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिले. त्यानुसार ही कार्यवाही पूर्ण झाली आहे.
या वेळी कुर्डूचे गा. पं. सदस्य अमोल गायकवाड, पवनराजे पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र, कर्नाटकातील हंगाम एकाच वेळी, राजू शेट्टी यांची जयसिंगपूरमध्ये शनिवारी ऊस परिषद

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT