Bhimashankar Sakal
पुणे

Bhimashankar News : दुसर्‍या सोमवारी सुमारे तीन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये पविञ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात.

सकाळ वृत्तसेवा

- संतोष जाधव

भीमाशंकर - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दुसर्‍या सोमवारी सुमारे तीन लाख भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती 'भीमाशंकर महाराज की जय' अशा घोषणा देत हलक्या श्रावण सरी व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. या वेळी शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये पविञ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपासुन ह्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे निसर्ग सौंदर्य फुलले असुन जिकडे तिकडे धबधबे हे खळखळुन वाहत आहेत.

निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन असा दुहेरी योग जुळुन आला. त्यामध्येच या वर्षी दुसरा सोमवार लागुन सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे श्री क्षेञ भीमाशंकर येथे प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. चौथा शनिवारी रविवारी सोमवारी अशा सुट्ट्या असल्यामुळे ह्या तीन ही दिवसांमध्ये गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला. या चार दिवसांमध्ये सुमारे सहा लाख भाविकांनी पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.

भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सौंदर्य फुलले आहे यामुळे भीमाशंकरला येणारे भाविक पर्यटक हे डिंभे धरण, गोहे घाट, तसेच ठिक ठिकाणे थांबुन निसर्गाचा आनंद लुटत होते. वाहतुकीला सोपे व्हावे यासाठी प्रशासनाकडुन पाच वाहनतळ ठेवण्यात आले होते.

परंतू गर्दीचा ओघ बघता सर्व वहाने, चौथ्या व पाचव्या थांब्याजवळ पार्क करण्यात आली होती. थांब्यापासुन भाविकांना बसस्थानकापर्यंत सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या १६ मिनीबस व १७ मोठ्या बसेस ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे भाविकांना फार वेळ थांबावे लागत नव्हते. शिवाजीनगर (पुणे) दर आर्ध्या तासाला जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.

मंचर भीमाशंकर रस्त्यावरील पालखेवाडी जवळील शनिमंदीर तसेच ठिक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडल्यामुळे दुसर्‍या सोमवारीही भाविकांना धक्केबुक्के खातच दर्शनाला जावे लागले.

श्रावणाच्या पडणार्‍या हलक्या सरी व धुके यामध्येच जंगल वस्ती 'भीमाशंकर महाराज की जय' अशा घोषणांमुळे दुसर्‍या सोमवारी भीमाशंकर व परिसर दुमदुमुण गेला.

प्रशासनाच्या वतीने जय्यद तयारी करण्यात आली होती. खेड पोलिस उपविभागिय अधिकारी सुदर्शन पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलिस निरिक्षक, एक सहाय्यक पोलिस निरिक्षक दहा पोलिस उपनिरिक्षक ६९ पोलिस कर्मचारी एक आर.सी.पी. पथक व तीस होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

देवस्थानच्यावतीने मंदीर व गाभारा विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आला होता. विविध फुलांनी श्री स्वामी समर्थ व शंकराची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.

भीमाशंकर येथे येणा-या भाविकांना मंदिर परिसरामध्ये व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी भीमाशंकर देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्ञी गवांदे,विश्वस्त दत्ताभाऊ कौदरे, रत्नाकर कोडिलकर, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे मंदीरामध्ये थांबुन व्यवस्था पाहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MH-12 RTO: पुण्याचा 'MH-12' नंबर इतिहासजमा होणार? RTO चा मोठा प्लॅन तयार; नवीन वाहनांना कोणता नंबर मिळणार?

Ajinkya Rahane: अजिंक्य निवृत्तीने कोलकाता नाइट रायडर्सचा भार हलका केला; IPL 2027 साठी फ्रँचायझी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Parliament canteen: संसदेच्या कँटीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण? विविध पदार्थांचे दर काय? व्हेज-नॉनव्हेज थाळ्यांच्याही किंमती वाढल्या

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Mumbai News: जुहू समुद्रकिनाऱ्यावर यांत्रिक जाळी, सागरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT