पुणे

भीमाशंकर येथून पायी दिंडी पालखी त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ

CD

भीमाशंकर, ता. ४ ः श्री क्षेत्र भीमाशंकर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ पायी दिंडी पालखी पौष पौर्णिमेला शनिवारी (ता. ३) रात्री ९ वाजता लुमाजी महाराज भारमळ यांची कीर्तनसेवा झाल्यानंतर रविवारी सकाळी ७ वाजता भीमाशंकर मंदिरात वीणेचे पूजन करून पालखी त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झाल्याची माहिती श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष राजू महाराज भारमळ यांनी दिली.
दिंडी सोहळ्याचा वडिलोपार्जित वारसा बाळासाहेब आढारी यांनी पुढे सुरू ठेवला आहे. हा दिंडी सोहळा १७ दिवसांचा आहे. दिंडी मार्ग पूर्णपणे डोंगरदऱ्यातून जात असून पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरील तोलार खिंड, हरिश्चंद्रगड चढून दिंडी अकोले तालुक्यात प्रवेश करते.
पालखीचा मार्ग भीमाशंकर, कडेवाडी, चिखली, फुलवडे, केळी, उंडेखडक, खिरेश्वर, हरिश्चंद्रगड, गुहिरे, कांचनगाव, घोटी, शेवगा डांग मार्गे पालखी त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी (ता. १३) जानेवारीला पोहोचणार असून त्याठिकाणी दोन दिवस भजन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम पार पाडून माघारी येताना रामकुंड नाशिक, वडाळा, सर्वतीर्थ टाकेद, आडसरे, खुबी मार्गे पालखी भीमाशंकर येथे सोमवारी (ता. १९) पोहोचणार आहे.
दिंडी सोहळ्याचे आयोजन श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर वारकरी मंडळाचे अध्यक्ष दत्ता महाराज दांगट तसेच संचालक मंडळाने केले असून दिंडीमध्ये विणेकरी तुकाराम महाराज जढर, सेवेकरी, प्रवचनकार, कीर्तनकार तसेच भीमाशंकर परिसरातील वारकरी, भाविक या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: नागपूर खंडपीठाचा निर्णय! आरटीई प्रवेशातील अंतराची अट स्थगित; पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, काय आहे आदेश..

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

30-Year Journey of Homemade Spice Business: कांडप यंत्रातून उभा राहिला स्वादाचा प्रवास; परळीच्या जाधव मसाल्याची ३० वर्षांची परंपरा

Takravan Lake Illegal Water Pumping: टाकरवण तलावातील अवैध पाणी उपशावर प्रशासनाची कारवाई; मोटारी काढल्या बाहेर

Donald Trump Tariffs on India : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आणखी टॅरिफ लादण्याची तयारी, यावेळी नेमकं कारण काय ?

SCROLL FOR NEXT