पुणे

‘भीमाशंकर’चे सभासदत्व देण्याची मागणी

CD

कवठे येमाई, ता. २६ : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या शिरूर तालुक्यातील ४२ गावांचा पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात समावेश करून या गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याचे सभासदत्व द्यावे, अशी मागणी शिरूर तालुक्यासह बेट भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बेट भागातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता.२४) याबाबतचे निवेदन भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांना दिले. यावेळी कारखान्याचे संचालक तसेच बाळासाहेब पठारे, माउली ढोमे, अविनाश पोकळे, नितीन थोरात, म्हातारबा शेलार, रवी म्हस्के, शशांक गीते, दत्ता दुडे, आबा वागदरे, बाळासाहेब सालकर, विकास वरे, रमेश वरे, नरेश ढोमे यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या उभारणीत आर्थिक सहभाग नोंदवीत आगाऊ भागभांडवल भरले असून, मोठ्या प्रमाणात उसाचा पुरवठा केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्याने तालुक्यातील शेतकरी भीमाशंकर कारखान्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, वर्षानुवर्षे ऊस व आर्थिक योगदान देऊनही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ४२ गावांचा समावेश झाला नसून सभासदत्व मिळाले नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे दोन्ही प्रश्न कारखान्याच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करून त्यावर सभेत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाकडे केली.

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या २५ वर्षांपासून भीमाशंकर कारखान्याला ऊस पुरवठा केला असून अनेक शेतकऱ्यांनी आगाऊ भागभांडवल भरले आहे. तरीही सभासदत्वापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. त्यामुळे तालुक्याच्या ४२ गावांचा कारखाना कार्यक्षेत्रात समावेश करून ऊस उत्पादकांना तातडीने सभासदत्व द्यावे.
- माऊली ढोमे,
अध्यक्ष, शेतकरी संघटना, शिरूर- आंबेगाव

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शिरूर तालुक्यातील ४२ गावांचा समावेश करून शेतकऱ्यांना सभासदत्व देणेबाबतचे निवेदन प्राप्त झाले आहे. मात्र, कार्यक्षेत्रात अतिरिक्त गावांचा समावेश करण्याचा व सभासदत्व देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार साखर आयुक्त व शासनाला आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाला याबाबत थेट निर्णय घेता येत नसल्याने संबंधित मागणी शासन व साखर आयुक्तांकडे करणे अपेक्षित आहे.
- बाळासाहेब बेंडे,
अध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT