पुणे

भीमाशंकर कारखान्याकडून प्रतिटन १७७ रुपये हप्ता जमा

CD

पारगाव, ता. २६ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामामध्ये गाळप केलेल्या आठ लाख ८३ हजार ६९ टन उसास १७७ रुपये प्रतिटनाप्रमाणे एकूण रक्कम १५ कोटी ६३ लाख तीन हजार रुपये सोमवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले.
याबाबत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी माहिती दिली की, कारखान्याचे संस्थापक-संचालक व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण आठ लाख ८३ हजार ६९ उसासाठी ३,५०० रुपये प्रतिटन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे. अदा केलेला ऊस दर वजा जाता देय असलेली उर्वरित रक्कम १७७ रुपये प्रतिटनाप्रमाणे होणारी रक्कम १५ कोटी ६३ लाख तीन हजार रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. दीपावलीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
कारखान्याने एफआरपीची रक्कम नेहमीच वेळेत दिलेली आहे. याशिवाय वाढीव रक्कम अंतिम हप्त्याचे स्वरूपात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे. कारखान्याने आजपर्यंत सभासद, बिगर सभासद व गेटकेन अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. गाळप हंगाम २०२६-२७ मधील संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे पूर्ण नियोजन केले आहे. त्यासाठी ऊस तोड व वाहतूक यंत्रणा हजर झालेली असून, कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करीत आहे. कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशात खळबळ! माजी शिक्षणमंत्र्यांना शंभर कोटींच्या लाच प्रकरणात अटक; तामिळनाडू सरकारची मोठी कारवाई

Piyush Goyal : रॉटरडॅम बंदराची हरित दिशा भारताच्या उपयोगाची; गोयल यांनी घेतला आढावा

Google Hiring Tips: गुगलमध्ये नोकरी मिळवायचीये? कंपनीच्या रिक्रूटरनेच सांगितल्या ५ महत्त्वाच्या टिप्स; रिझ्युमेपासून इंटरव्ह्यूपर्यंत सगळं जाणून घ्या !

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

Vande Bharat Sleeper: दिवाळी आधीच धावणार मुंबई-पुणे-बंगळुरू मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन

SCROLL FOR NEXT