Bhimashankar Temple sakal
पुणे

Bhimashankar Temple : तिसर्‍या श्रावणी सोमवारी दोन लाख भाविकांनी घेतले भीमाशंकरचे दर्शन

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी तिसर्‍या श्रावणी सोमवारी सर्वात मोठ्या प्रमाणा गर्दी पहावयास मिळते.

सकाळ वृत्तसेवा

भीमाशंकर : 'जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय घोष करत ब्रम्हवृंद व पुजारी बांधवांनी श्री क्षेञ भीमाशंकर येथे तिसर्‍या श्रावणी सोमवारीही पवित्र शिवलिंगावर जल्लाभिषेक करत महापुजा करुन आरती केली.

श्री क्षेञ भीमाशंकर हे बाराज्योर्तीर्लिंगापैकी सहावे ज्योर्तिर्लिंग आहे दरवर्षी श्रावणी महिन्यामध्ये विशेषत: दर सोमवारी देशाच्या कानाकोप-यातुन लाखो भाविक व पर्यटक येत असतात. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी तिसर्‍या श्रावणी सोमवारी सर्वात मोठ्या प्रमाणा गर्दी पहावयास मिळते.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी तिसर्‍या सोमवार निमित्त शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी साठी भाविक रविवारी सायंकाळ पासुनच येत होते.राञी मुक्कामासाठी आलेल्या भाविकांन मुळे भीमाशंकर तसेच परिसरातील हाॅटेल लाॅज फुल्ल झाले.मुक्कामासाठी कोणतीही सोय नसल्यामुळे काही भाविकांना मध्यराञीपासुनच दर्शन रांगेत थांबण्यास सुरुवात केली.

नियमानुसार पहाटे साडेचार ते पाच या वेळा मध्ये श्री क्षेञ भीमाशंकर मंदीरातील महापुजा व आरती भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष विश्वस्त पुजारी यांच्या हस्ते करण्यात आली.भीमाशंकर देवस्थानच्या वतीने शिवलिंग व गाभारा विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आला आहे.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास महापुजा व आरती झाल्यावर सुमधुर असा शंखनाद करण्यात आला.यामुळे भीमाशंकर व परिसर दुमदुमुण गेला. यावेळी भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.सुरेश कौदरे उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्ञी गवांदे विश्वस्त रत्नाकर कोडीलकर, दत्ताञय कौदरै,गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे उपस्थित होते. खेड पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिर परिसर तर घोडेगाव पोलिस स्टेशनच्यावतीने एक ते पाच नंबर पार्कींग तसेच बसस्थानक परिसरामध्ये बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MH-12 RTO: पुण्याचा 'MH-12' नंबर इतिहासजमा होणार? RTO चा मोठा प्लॅन तयार; नवीन वाहनांना कोणता नंबर मिळणार?

Ajinkya Rahane: अजिंक्य निवृत्तीने कोलकाता नाइट रायडर्सचा भार हलका केला; IPL 2027 साठी फ्रँचायझी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Parliament canteen: संसदेच्या कँटीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण? विविध पदार्थांचे दर काय? व्हेज-नॉनव्हेज थाळ्यांच्याही किंमती वाढल्या

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Mumbai News: जुहू समुद्रकिनाऱ्यावर यांत्रिक जाळी, सागरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT