पुणे

भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याची मागणी

CD

मंचर, ता. १४ : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी समर्थ ग्रामस्थ श्री क्षेत्र भीमाशंकरवाडी यांच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नाशिक कुंभमेळा २०२७च्या अनुषंगाने भीमाशंकर परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र, सध्या मंदिर परिसरात जागेचा अभाव असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. मंदिर सभामंडप, पायरीमार्ग, मंदिर परिसरातील कॉरिडॉर, पार्किंग सुविधा, तसेच नवीन आदर्श ग्रामप्रकल्प यांसारखी कामे झाल्यास भाविकांना सुविधा मिळण्याबरोबरच स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. परिसरातील पर्यटनालाही चालना मिळेल, असे निवेदनात नमूद केले आहे.
कुंभमेळा पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी राजगुरुनगर-वाडा-भीमाशंकर, बणकर फाटा-घोडेगाव-भीमाशंकर या राष्ट्रीय महामार्गांसह टोकावडे-कारकुडी, शिरगाव-मंदोशी-तळेघर, निगडाळे-भोरगिरी, डेहणे-नायफड-धाबेवाडी आणि जुन्नर-आहुपे-भीमाशंकर हे जोडरस्ते विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर सरपंच दत्तात्रेय हिले, मधुकर गवांदे दत्तात्रेय कौदरे गोरक्ष संतोष कानसकर, आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. धर्मादाय सहआयुक्त, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

Election Commission: उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार? काय आहे अपडेट?

Kartiki Ekadashi 2026 : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरच्या विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; 'या' वेळेस फक्त काही मिनिटेच मिळणार दर्शन!

New Orleans Ship Crash : मिसिसिपी नदीत क्रूझ बोटीला महाकाय टँकरची भीषण धडक! अवघ्या १५ मिनिटांत बोट उलटली; १२९ प्रवाशांचे पुढे काय झाले?

Latest Marathi News Live Update: मुंबईतील नरिमन हाऊसची रेकी; एटीएसकडून २० वर्षीय तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT