पुणे

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले होणार

बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर ७ ऑक्टोबर पासून खुले होणार.

सकाळ वृत्तसेवा

फुलवडे (ता. आंबेगाव) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर ७ ऑक्टोबर पासून खुले होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे भविकांबरोबरच, परिसरातील छोटे, मोठे व्यावसायिक तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने शासनाने अखेर घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. प्रशासनाने कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून त्याबाबत स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, देवस्थानचे विश्वस्त व पोलिस प्रशासन यांनी मंदिर परिसर व काम चालू असलेल्या रस्त्याची पाहणी केली. मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता आणि वाहतूक नियमनाच्या दृष्टीने वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी पार्किंगच्या सुविधेबाबत पाहणी करून रूपरेषा निश्चित करण्यात आली.

मंदिर सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून काम चालू असलेल्या रस्त्यापासून मंदिरा पर्यंतचा प्रवास करता येणार असून त्यामधून कोणालाही सूट दिली जाणार नाही. वाहतूक कोंडी बाबत व कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करून देवस्थान व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.

याप्रसंगी आंबेगाव पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, सुभाष मोरमारे, पोलिस उपअधीक्षक अनिल लंबाते, सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज, सतीश डौले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test ड्रॉ झाला, आता भारत WTC Final मध्ये कसा पोहोचणार? न्यूझीलंडचे झाले खूप नुकसान; जाणून घ्या समीकरण

Gold Rate Today: लग्नसराई सुरू होताच सोनं महागलं! 3 आठवड्यांच्या घसरणीला ब्रेक; मुंबई पुण्यासह तुमच्या शहरात किती झाला भाव?

IND vs NZ, 1st Test: भारताची विजयाची संधी हुकली, न्यूझीलंडची चिवट झुंज यशस्वी; पहिली कसोटी 'ड्रॉ'

रश्मिका मंदाना संतापली! कुटुंबीयांना ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाली, 'मी गप्प बसत नाही'

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर भीषण अपघात, बस डिव्हायडरला धडकली; दोघांचा मृत्यू, ३० जण जखमी

SCROLL FOR NEXT